भाजपा पाठोपाठ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक जाहीर
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने 40 स्टार प्रचारकांची नावे जाहीर झाली असून राष्ट्रवादीच्या मातब्बर मंडळींचा यात समावेश आहे .
येत्या 23 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने गोविंद खंडू मोकाटे हे उमेदवार म्हणून उभे असून तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन ते उभे राहिले आहेत . यापूर्वी याच राहुरी विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे तुतारी चिन्हावर उभे राहिले होते हे विशेष आहे .या शिवाय तत्कालीन विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे स्टार प्रचारक होते . तनपुरे यांनी माघार घेतल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडलेल्या दिसून येत आहेत .
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जनरल सेक्रेटरी रवींद्र पवार यांनी जाहीर केलेल्या ४० स्टार प्रचारकांमध्ये पक्षप्रमुख खासदार शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे , .अनिल देशमुख , आमदार रोहित पवार , माजी कॅबिनेटमंत्री जयंत पाटील , जितेंद्र आव्हाड , फौजिया खान , राजेश टोपे आदींचा समावेश आहे .
यापूर्वीच भाजपाने आपल्या ४० स्टार प्रचारकांची नावे जाहीर केली असून राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी राहुरी पाथर्डी नगर तालुक्यातील मतदार संघामध्ये पुढील अकरा दिवसांमध्ये भाजपाचे 40 , राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 40 यापैकी कोण कोण या निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत याकडे संपूर्ण राहुरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे लक्ष लागले आहे .


Post a Comment
0 Comments