Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या स्टार प्रचारक म्हणून राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे : समर्थकांमध्ये आनंद

 राहुरी - विशेष वृत्त



राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या स्टार प्रचारक म्हणून माजी राज्यमंत्री व राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचा समावेशाने राहुरीसह नगर जिल्ह्यातील तनपुरे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे .

 लोकसभा निवडणूक - 2024 साठी राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाकडे आपापल्या पक्षासाठी प्रचार करण्यासाठी स्टार प्रचारकांची यादी नुकतीच देण्यात आली होती . त्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 40 नेत्यांची यादी आयोगाकडून मान्यता मिळवून आली आहे .

या 40 स्टार प्रचारकांमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार , खासदार सुप्रिया सुळे , राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह खासदार अमोल कोल्हे , निलेश लंके , आणि राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचा समावेश आहे .

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा नेते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव करून प्राजक्त तनपुरे भरघोस मतांनी निवडून आले होते. तत्कालीन राज्य मंत्रिमंडळात तनपुरेंचा राज्यमंत्री म्हणून देखील समावेश झालेला होता . तनपुरे यांच्याकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्यानंतर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी त्या यशस्वीपणे पार पाडल्या . सध्या महायुतीच्या शासनाविरोधात आमदार प्राजक्त तनपुरे नेहमीच आपल्या अमोघवाणीमुळे आणि मुद्देसूद टीकांमुळे चर्चेत आलेले आहेत . काही काळापूर्वी निळवंडे कालव्याच्या जलपूजनाच्या वेळी जेष्ठ काँग्रेस नेते, आमदार नेते बाळासाहेब थोरात यांनी तनपुरे यांच्या मुद्देसूद भाषणावर प्रभावित होऊन प्राजक्त तनपुरे यांनी असेच आपले बोलणे कायम ठेवावे , असे म्हणत कौतुक केले होते . तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राहुरीतील दौऱ्यात प्राजक्त तनपुरे यांचे कौतुक केले होते. 

आता लोकसभा निवडणूक - 2024 चा प्रचाराचा धुराळा चांगलाच उठणार असल्याने आणि त्यात आमदार प्राजक्त तनपुरे यांचीही स्टार प्रचारकांमध्ये नाव आल्याने तनपुरे यांच्या नावाची चर्चा राहुरी , पाथर्डी , नगर तालुक्यासह जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील समर्थकांमध्ये सुरू झाली आहे .

Post a Comment

0 Comments