Type Here to Get Search Results !

माजी आमदार प्राजक्त तनपुरे पुन्हा ऍक्टिव्ह; मुख्यमंत्र्यांना या गंभीर प्रश्नात लक्ष देण्याचे केले आवाहन

माजी आमदार प्राजक्त तनपुरे पुन्हा ऍक्टिव्ह; मुख्यमंत्र्यांना या गंभीर प्रश्नात लक्ष देण्याचे केले आवाहन 



सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष वृत्त



विधानसभेतील पराभवानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाल्याचे दिसत असून विविध कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती लावली .

 तसेच राज्यातील बांधकाम ठेकेदारांच्या थकीत बिलांबाबत मुख्यमंत्र्यांना या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याबाबत सोशल मीडियावर लक्ष वेधले आहे .

 विधानसभा निवडणुकीत युती सरकारचे कल दिसत असल्याने राहुरी विधानसभा मतदारसंघात विक्रमी काम करूनही व लोकप्रियता असूनही माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले . मात्र त्यानंतरही न खचता राहुरीसह नगर , पाथर्डी मतदारसंघातील प्रेम व आपुलकी मिळवलेल्या समर्थकांसाठी तनपुरे पुन्हा ऍक्टिव्ह झाल्याचे दिसत आहे . 

राहुरी तालुक्यासह विविध ठिकाणी तनपुरे यांनी विविध धार्मिक कार्यक्रम व लग्न समारंभांना उपस्थिती लावली. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध विभागातील बांधकामांची थकित देणे आहेत , त्यावर माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. 

 या तनपुरे यांनी म्हटले आहे की , सरकारच्या विविध विभागांद्वारे सुरू असलेल्या बांधकाम कार्याचे सुमारे ८९ हजार कोटी रुपये शासनाने जुलै २०२४ पासून थकवले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र स्टेट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने सुरू असलेली कामे थांबवण्याचा थेट इशारा सरकारला दिला आहे. ५ फेब्रुवारी पासून विकास कामांना थांबा लागणार का हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 


खिशात दिडकी नसताना गतिमान महाराष्ट्राच्या गप्पा मारायच्या. अनेक मोठे प्रकल्प जाहीर करायचे मात्र त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पैसा नाही. त्यात सुकाळ योजनांचा बोजा स्वार्थासाठी शासनाच्या तिजोरीवर ओढवून घेतला. आता विकास कामे बंद होण्याची नामुष्की सरकारवर येतेय, यातच यांचा फोलपणा लक्षात येतो. असा टोलाही माजी आमदार तनपुरे यांनी लगावला आहे .


दावोस वारीचे गोडवे गाणे संपले असेल तर मुख्यमंत्री महोदयांनी आता या गंभीर प्रश्नाकडे विशेष लक्ष द्यावे , असे तनपुरे यांनी म्हटले आहे. सध्या या विषयावर  तनपुरे यांनी केलेल्या टिकेबाबत सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे . 



Post a Comment

0 Comments