Type Here to Get Search Results !

शिवरायांच्या पुतळ्याची पुन्हा विटंबना ; राहुरी कडकडीत बंद - रस्ता रोको

शिवरायांच्या पुतळ्याची पुन्हा विटंबना ; राहुरी कडकडीत बंद - रस्ता रोको




सतर्क खबरबात जिल्ह्याची  - विशेष वृत्त



 छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली



  घटनेची माहिती समजताच आज राहुरीत तमाम शिवप्रेमी एकत्र येत राहुरी पोलीस स्टेशनवर निषेध व्यक्त करत नगर मनमाड महामार्ग संतप्त शिवप्रेमींनी रोखला . पुतळा विटंबना प्रकरणी तात्काळ संबंधित आरोपींना अटक करण्याची मागणी शिवप्रेमींनी केली .


राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले राहुरी बाजार समितीचे सभापती जेष्ठ नेते अरुण साहेब तनपुरे आदींनी यावेळी आंदोलनात सहभाग नोंदवला

सदर घटनेची माहिती समजतात  राहुरी शहर शहरातील दुकाने पटापट बंद झाली . नगर मनमाड महामार्गावर शिवप्रेमींनी दुपारी साडेचार वाजता रस्ता रोको केला . यावेळी विटंबना करणाऱ्या देशद्रोहीचा  टायर जाळून निषेध करण्याचाही प्रयत्न झाला . राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला आहे .
राहुरीच्या नगर मनमाड महामार्गावर दोन्ही बाजूंनी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येत होत्या

Post a Comment

0 Comments