Type Here to Get Search Results !

खुशखबर : देशात सरासरीच्या 106 % तर राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार

खुशखबर - देशात सरासरीच्या 106% , राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार 




राहुरी - विशेष वृत्त

सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांसाठी पावसाची  खुशखबर !!

एकीकडे सर्व देशाचे यंदाच्या मोसमी पावसाकडे लक्ष असताना आज भारतीय हवामानशास्त्र अर्थात आय एम डी ने आज दुसऱ्या टप्प्यातील मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे .



आयएमडीचा दुसऱ्या टप्प्यातील मॉन्सून अंदाज प्रमाणे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत देशात सरासरीच्या १०६ %, तर राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे  .

या शिवाय महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मॉन्सून पोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.  

पुणे येथील हवामान , विज्ञान , खगोल , आदी विषयांचा अभ्यास करणाऱ्या सतर्क या हौशी संस्थेच्या गटाने देखील याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे  .या अंदाजामुळे सध्या उष्णतेने , गर्मीने होरपळत चाललेला सर्वसामान्य माणसासह शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार असून आता लवकरच येऊन ठेपलेल्या पावसाकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिलेले आहे .

Post a Comment

0 Comments