राहुरी महायुतीचे शिवाजीराव कर्डिले यांना 34 हजाराहून अधिक मताधिक्य ! भाजपा, कर्डिले समर्थकांचे कॅबिनेट मंत्रिपदाकडे लक्ष
राहुरी ( प्रतिनिधी )
223 राहुरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले 22 व्या फेरी अखेर 34 हजार 700 हून अधिक मतांची आघाडी मिळवत महायुतीच्या सत्तेत आले आहेत .
आज सकाळी लोकनेते रामदास पाटील धुमाळ विद्यालयातील जिमखान्यात मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीचे चार फेऱ्या कमी अधिक प्रमाणात मतांचे आकडे सांगत होते. नंतर काही फेऱ्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे व महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्यातील कर्डिले हे मताधिक्य एक एक फेरी करत वाढत गेले .
दुपारी दोन च्या सुमारास निवडणूक पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 22 व्या फेरी अखेर महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांना एकूण एक लाख 34 हजार 889 इतकी मते मिळाली होती , तर महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांना एक लाख 144 इतकी मते मिळाली . 22व्या फेरी अखेर कर्डिले यांनी 34 हजार 700 गुण अधिक मतांनी आघाडी मिळवलेली होती .
राहुरी कॉलेजच्या मतमोजणीच्या परिसरात दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते समर्थकांनी मोठी गर्दी केली होती . कर्डिले यांच्या विजयाच्या शिक्कामोर्तुभानंतर राहुरी शहर , तालुक्यातील समर्थकांमध्ये व नगर पाथर्डी मतदार संघातील अनेक गावांमध्ये जल्लोषाचे वातावरण पहावयास मिळाले .
राज्यात महायुतीचीच सत्ता येणार असल्याने भारतीय जनता पक्षा कडे निष्ठावंत म्हणून मानल्या जाणारे कर्डिले आता पुन्हा आमदार झाल्याने त्यांच्या समर्थकांचे लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री पदाकडे लक्ष लागल्याचे चर्चा सध्या सुरू आहे .
m.jpg)


Post a Comment
0 Comments