त्या दरोड्यातील संशयित आरोपी ग्रामस्थांनी पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल ?
संगमनेर - विशेष वृत्त
संगमनेरच्या साकुर येथील दरोड्यातील ते संशयित ग्रामस्थांनी पकडण्याचा व्हिडिओ व्हायरल वायरल झाला असून याबाबत मात्र अद्यापही अद्याप कोणतीही पुष्टी झाली नसल्याने नेमका हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत चर्चा सुरू आहेत .
सोमवारी संगमनेर तालुक्यातील साकुर येथील सराफ दरोडा प्रकरणानंतर आज दुपारपासून पठार भागात दोघा संशयीतांना ग्रामस्थांनी पकडण्याचा व्हिडिओ
सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी दुपारी संगमनेर तालुक्यातील साकुर येथील कान्हा ज्वेलर्सवर दरोडा पडला होता. दरोड्यानंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती .
संगमनेर सह नगर जिल्हा पोलिसांनी विविध पथके संशयित आरोपींच्या शोधासाठी पाठवली आहेत . दरम्यान आज दुपारपासून अनेक सोशल मीडिया साइटवर पठार तथा डोंगराळ भागात स्थानिक ग्रामस्थांनी काही संशयित पकडण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे . हा नेमका व्हिडिओ कुठला आहे ? याची सायंकाळपर्यंत कोणताही पुष्टी वा दुजोरा मिळू शकला नाही . मात्र साकुर दरोड्यातील संशयित आरोपी असावेत याबाबत चर्चा सायंकाळपर्यंत सुरू होती .



Post a Comment
0 Comments