Type Here to Get Search Results !

शिर्डीत रविवारी 29 डिसेंबरला महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थांचे राज्यस्तरीय अधिवेशन

 शिर्डी येथे रविवार दि. 29 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थांचे राज्यस्तरीय अधिवेशन



राहुरी ( प्रतिनिधी )

         शिर्डी येथील शांती कमल हॉटेलच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थांचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले असून या अधिवेशनासाठी राज्यभरातील कौशल्य विकास संस्था चालक उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे .



         या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच अहमदनगर जिल्ह्यातील आमदार सर्वश्री शिवाजीराव कर्डिले , आमदार श्री संग्राम भैया जगताप, आमदार श्रीमती मोनिकाताई राजळे, आमदार श्री विठ्ठलरावजी लंघे, आमदार श्री अमोल जी खताळ आमदार श्री. डॉ किरणजी लहामटे हे उपस्थित राहणार आहेत .

        या अधिवेशनात व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणी तसेच नवीन संधी तसेच शासन दरबारी प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांवरती तसेच चळवळी बाबत वैचारिक विषयांची चर्चा केली जाणार आहे . यात कौशल्य विकास संस्थांच्या विविध संघटनांची एक सुकानु समिती स्थापन करून त्या मार्फत इथून पुढचा लढा उभारण्यासाठी या अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे .

   महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ या शासकीय बोर्डाच्या मान्यताप्राप्त अशा 2275 संस्था राज्यात कार्यरत असून या संस्थांना व्यवसाय करत असताना येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी तसेच वेगवेगळ्या ट्रेड मधील वेगवेगळ्या नवीन संधी याविषयी एकत्रित चर्चा करण्यासाठी शिर्डी येथे सदर अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे .

या अधिवेशनासाठी आमदार सत्यजित दादा तांबे आणि हेमंत जी ओगले यांनी अधिवेशनास आपल्या शुभेच्छा कळविले आहेत .

 या अधिवेशनास सर्व कौशल्य विकास संस्था चालकांनी उपस्थित राहण्यासाठी अधिवेशन संयोजन समिती अहिल्यानगर च्या सर्व सदस्यांनी आव्हान केले आहे.

Post a Comment

0 Comments