Type Here to Get Search Results !

सुरत - चेन्नई ग्रीन फिल्ड हायवे - पायाभरणी होऊन दोन वर्षे पूर्ण ; महाराष्ट्रातील काम केव्हा सुरू होणार


सुरत - चेन्नई ग्रीन फिल्ड हायवे - पायाभरणी होऊन दोन वर्षे पूर्ण ; महाराष्ट्रातील काम केव्हा सुरू होणार


                                ( संग्रहित फोटो )

सतर्क खबरबात जिल्ह्याची  - ( विशेष वृत्त )


केंद्राच्या महत्त्वकांक्षी  45 हजार करोड रुपये खर्चाच्या सुरत - चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवेच्या  पायाभरणीला ( Foundation Stone ) जानेवारी 2025 मध्ये दोन वर्षे पूर्ण होत आहेत .



( संग्रहित फोटो )


जानेवारी 2023 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी केली होती . दक्षिणेकडील राज्यांना उत्तरेला जोडणाऱ्या या ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे प्रकल्पाच्या योजनेची घोषणा मार्च 2021 मध्ये रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने केली होती . जानेवारी 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजनेचे भूमिपूजन केल्यानंतर कर्नाटकातील योजनेतील अक्कलकोट यादकीर सेक्शनच्या कामाला प्रारंभ झाला . 


                            ( संग्रहित फोटो )

            या  कामाची  पूर्तता  डिसेंबर  2025  मध्ये  पूर्णत्वास  येणार  आहे .   हा  प्रकल्प  डिसेंबर  2026  पर्यंत  पूर्ण करण्याचा एन . एच . ए . आय.  चा मानस  आहे .

                 ( संग्रहित फोटो )

            दरम्यान या एक्सप्रेस हायवेच्या दोन टप्प्यातील पहिल्या टप्प्यात सुरत - सोलापूर इकॉनोमिक कॉरिडॉर मध्ये सुरत नाशिक नगर सोलापूर या सेक्शन मधील 546 किलोमीटर मध्ये नाशिक जिल्ह्यातील बागलान मालेगाव सिन्नर नगर जिल्ह्यातील संगमनेर राहुरी नगर तर सोलापूर जिल्ह्यातील उत्तर व दक्षिण सोलापूर व मोहोळ या तालुक्यांचा समावेश आहे .


                       ( संग्रहित फोटो )


       2016 मध्ये याच प्रकल्पाची अधिसूचना जारी होताच राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता . त्यानंतर केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वेळोवेळी याबाबत प्रकल्पाची माहिती देत शेतकरी उद्योग व वेगवेगळ्या क्षेत्राला कसा लाभ होईल , याची माहिती दिली होती .
आठ वर्षांपासून सुरू झालेला हा विषय अद्याप सुरूच असून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या भूमिकेविषयी राग व रोष कायम असल्याचे चित्र आहे . गेल्या तीन ते चार वर्षांपासून या प्रकल्पाचे भिजत घोंगडे कायम असून या प्रकल्पामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या उताऱ्यावरील शासनाचा सुरत चेन्नई हैदराबाद प्रकल्पाचा बोजा कायम असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी दुहेरी नव्हे तर तिहेरी संकटात सापडला असून  'आई भिक मागू देईना व बाप घरात घेईना' अशी स्थिती या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची झाल्याची सध्याचे चित्र आहे .
त्यातच या महत्त्वकांक्षी अशा सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवेच्या पायाभरणीला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतरही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समोरील समस्यांचे डोंगर कायम असून आता 2025 सालात या वर्षात काय पहावयास मिळणार ? असा प्रश्न प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सध्या तरी सरत्या वर्षा अखेरीस पडल्याचे चित्र दिसून येत आहे .

सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवे प्रकल्प असा असेल - टप्पा - 1

सुरत सोलापूर इकॉनोमिक कॉरिडॉर प्रकल्पाचे अंतर 546 किलोमीटर असेल
महाराष्ट्रातील जिल्हे नाशिक नगर सोलापूर
कर्नाटकातील जिल्हे कलबुर्गी व रायचूर

सेक्शन टप्पा - 2

  सोलापूर चेन्नई इकॉनोमिक कॉरिडोर -
अक्कलकोट , मेहबूबनगर , महाराष्ट्र , कर्नाटक , तेलंगाना ,
प्रकल्पाचे अंतर - 707 किलोमीटर
कर्नुल , कलबुर्गी , कडप्पा , तिरुपती , श्रीपेरामबुद्र

सध्याची स्थिती -

कर्नाटकातील हसापूर बदादल 36. 40 किलोमीटर च्या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे . अक्कलकोट यादगिर सेक्शनमध्ये काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्णत्वास येणार आहे .

Post a Comment

0 Comments