राहुरीतील राष्ट्रीय महासत्संग सोहळ्याचे प.पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांना सेवेकऱ्यांकडून आमंत्रण
सोहळ्याची जय्यत तयारी सुरू - युवानेता हर्ष तनपुरे
राहुरी ( सतर्क खबरबात टीम ) - विशेष वृत्त
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ अंतर्गत राहुरी येथे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य महा सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली.
या भव्य सोहळ्याची जय्यत तयारी सध्या सुरू असून राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे , युवा नेता हर्ष तनपुरे यांच्या अधिपत्याखाली ही तयारी सध्या सुरू आहे .
सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काल युवा नेता हर्ष तनपुरे यांनी दिंडोरी येथे जाऊन परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांना आयोजक व सर्व सेविकाऱ्यांच्या वतीने निमंत्रण आमंत्रण दिले .
युवा नेता हर्ष तनपुरे यांनी आमंत्रण दिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की ,
आज आमच्या आयुष्यातील भाग्याचा दिवस दिंडोरी येथे जाऊन प.पु.गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांना शुक्रवार दि. 31 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4 वा. मुळा सुतगिरणी मैदान, राहुरी फॅक्टरी येथे होणाऱ्या राष्ट्रीय महा सत्संग सोहळाचे आम्ही आयोजक व सर्व सेवेकरांच्या वतीने आमंत्रण दिले. प्रसंगी गुरुमाऊलींनी आपुलकीने कार्यक्रमाच्या नियोजनाची सविस्तर चर्चा केली व शुभाशीर्वाद दिले.
दरम्यान , राहुरी सूतगिरणी जवळ या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे . भव्य मंडप पूजनीय अण्णासाहेब मोरे यांच्या प्रवचनाचे व्यासपीठ , अन्य छोट्या-मोठ्या व्यवस्था तसेच पार्किंग आदीबाबत सध्या जयत तयारी सुरू असून जिल्हाभरातून सेवेकरी येणार असल्याने बाजार समिती सभापती अरुण तनपुरे , युवा नेता हर्ष तनपुरे , तसेच सेवेकऱ्यांच्या वतीने सोहळ्याच्या तयारीकडे लक्ष देऊन आहेत .





Post a Comment
0 Comments