Type Here to Get Search Results !

मिरजेतील गोल्ड व्हॅल्यूवर कार्यशाळेला प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार चित्राताई वाघ राहणार उपस्थित

मिरज येथील गोल्ड व्हॅल्यूवर कार्यशाळेला प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार चित्रा ताई वाघ राहणार उपस्थित



 सांगली - योगेश कुलथे यांजकडून

     २ फेब्रुवारी २०२५ रोजी सांगली जिल्हा "गोल्ड व्हॅल्यूअर असोशिएशन महाराष्ट्र " च्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा पटवर्धन हॉल मिरज येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या प्रमुख पाहुण्या सोनार समाजाच्या फायर ब्रँड नेत्या माननीय आमदार चित्राताई वाघ या आहेत तर उद्घाटन माजी पालक मंत्री तथा कामगार मंत्री, आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे व आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या हस्ते होणार आहे . 

२ फेब्रुवारी २०२५ रोजी "गोल्ड व्ह्याल्यूर्स असोसिएशन‌, महाराष्ट्राच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन मिरज येथील पटवर्धन बँक्वेट हॉल येथे करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या प्रमुख पाहुण्या सोनार समाजाच्या फायर ब्रँड नेत्या माननीय आमदार श्रीमती चित्राताई वाघ ह्या आहेत, उद्घाटन माजी पालक मंत्री तथा कामगार मंत्री माननीय आमदार डॉ. श्री सुरेशभाऊ खाडे व माननीय आमदार श्री सुधीर दादा गाडगीळ ह्यांच्या हस्ते होणार आहे.

गोल्ड व्ह्याल्यूर् हा बँक व तिचे ग्राहक यांच्यामधील एक दुवा आहे. त्याला व्हॅल्यूएशन करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, तुटपुंज्या व्हॅल्यूएशन फिचा मुद्दा असो वा बनावट सोन्याच्या दागिन्यांच्या फसवेगिरीचा. आपल्या समस्या सोडविण्यासाठी एक खंबीर संघटन असावे, अशा संकल्पनेतून आम्ही महाराष्ट्रातील तमाम गोल्ड व्ह्याल्यूर्सनी १९ मार्च २०२१ रोजी "गोल्ड व्ह्याल्यूर्स असोसिएशन, महाराष्ट्राची स्थापना केली. आज महाराष्ट्रातील जिल्ह्या जिल्ह्यातून असंख्य व्ह्याल्यूर्स गोल्ड व्ह्याल्यूर्स असोसिएशनच्या बॅनर खाली एकत्र आले आहेत. सांगली जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष श्री योगेश कुलथे ह्यांच्या नेतृत्वाखाली १५० च्या जवळपास व्ह्याल्यूर्स सभासद झाले आहेत.


सर्वात कमी वेळेत ग्राहकांना कर्ज वितरित करण्याचा सर्वात सोपा मार्ग बँका देत असलेले "सुवर्ण तारण कर्ज". ग्राहकांनी तारण ठेवण्यासाठी आणलेले सोने/सोन्याचे दागिन्यांचे व्हॅल्यूएशन करण्यासाठी "गोल्ड व्ह्याल्यूर्स" ची पॅनेल वर नेमणूक केली जाते.

कार्यशाळेच्या माध्यमातून व्हॅल्यूएशन करताना, गोल्ड व्ह्याल्यूर्ना फॉर्मिंग आणि कमी टंचाचे दागिने, बनावट तसेच बांधीव दागिने शास्त्रोक्त पद्धतीने कसे ओळखायचे, नवनवीन तंत्रज्ञान कार्यप्रणालीचा वापर करून अस्सल सोने कसे ओळखावे याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, सोने तपासण्याच्या विविध पद्धती, कसोटीचे प्रकार, त्याचा योग्य वापर कसा करावा याचे मार्गदर्शन. तसेच व्ह्याल्यूर्ना करारमदार करताना घ्यावयाची काळजी, व्यावसायिक रित्य व्हॅल्यूएशन करताना पाळावायचा प्रोटोकॉल बाबतीत प्रबोधन करून त्यांना प्रशिक्षित केले जाते.


अशा प्रकारच्या कार्यशाळा, गोल्ड व्ह्याल्यूर्स असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात घेण्याची संकल्पना आहे. ह्या पूर्वी, सांगली, पुणे, मुंबई, नाशिक, रत्नागिरी तसेच ठाणे येथे भरघोस प्रतिसादात संपन्न झाल्या आहेत. सांगलीतील व्ह्याल्यूर्सच्या मागणीनुसार हि दुसरी कार्यशाळा होत आहे. आगामी कार्यशाळा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर जिल्ह्यासाठी पंढरपूर येथे असणार आहे. अशा कार्यशाळांमुळे व्ह्याल्यूर्सना चांगला फायदा होताना दिसतो आहे.


बनावट फेक दागिन्यांचा सद्य परिस्थितीतील सुळसुळाट पाहता सांगली कार्यशाळेचा लाभ नुसताच जिल्ह्यातील व्ह्याल्यूर्सनी नव्हे तर सराफ/सोनारानी सुध्दा घ्यावा असे आवाहन गोल्ड व्ह्याल्यूर्स असोसिएशन, महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम काळे, कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र दिंडोरकर, तज्ञ मार्गदर्शक श्री भरत ओसवाल व असोसिएशनचे पश्चिम विभाग प्रमुख व सांगली जिल्हा अध्यक्ष श्री योगेश कुलथे यांनी केले आहे.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सतीश जोग, तालुका अध्यक्ष अभिषेक बेलवलकर, तालुका उपाध्यक्ष मिलिंद पेंडुरकर,शैलेन्द्र पेडणेकर, आदि पदाधिकारी उपस्थित होते.     

Post a Comment

0 Comments