Type Here to Get Search Results !

नागपुरातून निघालेल्या सहकार दिंडीचे राहुरी जोरदार स्वागत ; 9 तारखेला दोन सहकार दिंड्या प्रवरानगरात येणार एकत्र

 नागपुरातून निघालेल्या सहकार दिंडीचे राहुरी जोरदार स्वागत ; 9 तारखेला दोन सहकार दिंड्या प्रवरानगरात येणार एकत्र



राहुरी   ( शहर प्रतिनिधी )

सहकार चळवली बद्दल जो जनतेच्या मनात अविश्वास निर्माण झाला होता तो विश्वास पुन्हा प्राप्त करण्याच्या दृष्टीने शिर्डी येथे ९फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सहकारपरिषदेतून दूर होईल असा विश्वास जिल्हा पतसंस्था स्तर्य संस्थेचे अध्यक्ष व प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सुरेश वाबळे राहुरी येथे बोलत होते.



९ फेब्रुवारी २०२५ रोजी शिर्डी येथे होणाऱ्या कै वैकुंठभाई मेहता सहकार दिंडीचे स्वागत प्रसंगी सुरेश वाबळे बोलत होते. ही सहकार दिंडी नागपूर येथून निघाली असून दुसरी दिंडी मुंबई येथून निघाली आहे या दोन्ही दिंडी प्रवरानगर येथे पदमश्री विट्टलराव विखे यांचे समाधीच्या ठिकाणी समारोप होणार आहे. असे वाबळे यांनी सांगितले. या सहकार दिंडीत चित्ररथ, कलापथक, डोली बाजा, सहभागी झाले आहे. सहकार दिंडीचे बाजार समितीच्या आवारात आगमन होताच राहुरी तालुक्यातील पतसंस्था मल्टिस्टेट संस्थांचे पदाधिकारी व्यवस्थापक कर्मचारी वर्ग महिला कर्मचारी ग्राहक सहभागी झाले होते. दिंडी शहरातून निघण्यापूर्वी सहकार महर्षी तालुक्याचे शिल्पकार डॉ कै बाबुरावदादा तनपुरे यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.त्यानंतर दिंडी शहरातून वाजतागाजत नवीपेठ शनी चौक कॉलेज रोड मार्गे रवाना झाली 

यावेळी शिवाजीराव कपाळे, शामराव निमसे, प्रकाश पारख, बाळासाहेब उंडे,सुरेश दौले,रावसाहेब पवार,आबासाहेब वाळुंज,सुजीत वाबळे,व्यवस्थापक जी एम चंद्रे, अनिल वर्पे, अनिरुद्ध लोखंडे,बाबासाहेब शिंगोटे, विनोद दौले, मिलिंद सातभाई अजय आघाव,आदि सह सहकार खात्याचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

फोटो

Post a Comment

0 Comments