Type Here to Get Search Results !

साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे चौक राहुरी या ठिकाणी माता रमाई आंबेडकर जयंती साजरी

 साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे चौक राहुरी या ठिकाणी माता रमाई आंबेडकर जयंती साजरी



राहुरी  ( प्रतिनिधी )


साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे चौक राहुरी मध्ये माता रमाई आंबेडकर यांची जयंती भगव्या ग्रुप च्या वतीने अभिवादनांचा कार्यक्रम करण्यात आला होता .

या कार्यक्रमां प्रसंगी भगव्या ग्रुपचे राज्य प्रवक्ते निलेश जगधने , अध्यक्ष राजुभाऊ अढागळे , राहुरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दशरथ दादा पोपळघट , गजानन सातभाई , माजी आरोग्य निरीक्षक भास्करराव आल्हाट ,वाय एस तनपुरे , सामाजिक कार्यकते , बाबासाहेब साठे , मयुर दुधाडे यांनी प्रतिमेचे पुजन करण्यात आले . यावेळी भगवा ग्रुप चे राज्य प्रवक्ते यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त करतांना सांगितले की माता रमाई या त्यागाचे प्रतीक आहेत, त्यांच्या जीवनातून प्रत्यकाने प्रेरणा घेणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया निलेश जगधने यांनी दिली.

याप्रसंगी मयुर दुधाडे , सचिन जगधने , रविंद्र जगधने , दिपक आव्हाड , रमेश जगधने , सागर जगधने , रवि गुंजाळ , पिनु ससाणे इ राहुरी शहरातील नागरिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments