राहुरी बाजार समिती अमृत महोत्सव : पवई फिल्टर पाडा गौरव मोरे व श्रेया बुगडे बुधवारी राहुरीत
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अमृत महोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन सभापती अरुण साहेब तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे .
राहुरी बाजार समितीचे सभापती ज्येष्ठ नेते अरुण साहेब तनपुरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
बुधवार दिनांक 19 मार्च 2025 रोजी बाजार समितीच्या आवारात सिने कलाकारांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम दुपारी चार वाजता होणार आहे .
चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे , पवई फिल्टर पाड्याचा प्रसिद्ध कलाकार गौरव मोरे यांच्यासह अन्य कलाकार या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत . सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची आवाहन बाजार समितीच्या संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .
राहुरी तालुक्याचे भाग्यविधाते डॉक्टर दादासाहेब तनपुरे यांनी 1954 साली स्थापन केलेल्या राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीला 75 वर्षे अर्थात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल भव्य असा कार्यक्रम होत आहे . विशेष करून याच दिवशी बाजार समितीचे सभापती अरुण साहेब तनपुरे यांचा देखील वाढदिवस असल्याने दुग्ध शर्करा योग मानला जात आहे .




Post a Comment
0 Comments