Type Here to Get Search Results !

राहुरी रेल्वेस्टेशन शाप की वरदान : रेल्वे स्टेशनचेच झाले स्थलांतर !

राहुरी रेल्वेस्टेशन शाप की वरदान : रेल्वे स्टेशनचेच झाले स्थलांतर !


राहुरी ( विशेष प्रतिनिधी )

    पूर्वी राहुरी - वांबोरी नाव व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जात होते . रस्ते , रेल्वेची सुविधा असल्याने तसेच साखर ,

कांदा व अन्य उत्पादनासाठी रेल्वे गोदाम उपलब्ध होते. 2006 नंतर राहुरी रेल्वेस्टेशनचे महत्त्व कमी केले गेल्याची भावना निर्माण झाली .



      निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींकडून राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन बाबत दुर्लक्ष होत गेल्याने तसेच मध्य रेल्वेकडून अनेक योग्य व अयोग्य निर्णय घेतले गेल्याने राहुरी रेल्वे स्टेशनचे महत्त्व अक्षरशः कमी झाले .



2016 नंतर तालुक्यातील पाच पैकी चार रेल्वे गेट बंद होऊन तेथे अंडरपास (भुयारी मार्ग ) करण्यात आले . 2018 च्या काळात राहुरी रेल्वे स्टेशनवरील मालवाहतुकीचे गोडाऊन देखील बंद झाले . 


( संग्रहित व्हिडिओ - साभार )


2020 पासून आत्तापर्यंत दौंड - नगर - मनमाड रेल्वेमार्गावर दुहेरीकरण , विद्युतीकरणासह सुरू झाले . सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहे .


( संग्रहित व्हिडिओ )

मध्यंतरी राहुरी शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षणही झाले . अनेक एक्सप्रेस गाड्यांचा थांबा विद्युतीकरण, दुहेरीकरणाच्या नावाखाली बंद झाल्याने राहुरीसह शिर्डी , शनि शिंगणापूरला जाणारे भाविक पुणे , मुंबईला जाणारे व्यावसायिक , विद्यार्थी , नोकरदार यांना अन्य मार्गांचा आत्तापर्यंत अवलंब करावा लागत आहे . एवढेच नव्हे उशिरा राहुरी रेल्वेस्टेशन भुयारी मार्गाचे लगतच्या रस्त्याचे काम होत आहे . इतके सगळे होत असताना आता मूळ राहुरी रेल्वेस्टेशनचे ठिकाण आता स्थलांतरित होत श्रीरामपूरकडील भागाकडे 300 ते 400 मीटर अंतरावर रेल्वे विभागाने तयार केले आहे .

 राहुरी रेल्वेस्टेशनवर फक्त पुणे नांदेड व नांदेड पुणे या डेमो पॅसेंजर गाड्या थांबतात , अन्य गाड्या थांबत नाहीत . रेल्वे स्टेशनवर एक प्रतिक्षालय (वेटिंग रूम) , आरक्षण केंद्र देखील होते . रेल्वे प्रवासी संघ , तांदूळवाडी ग्रामपंचायत , राहुरी तालुक्यातील अनेक संस्था व संघटनांनी राहुरी स्टेशनचा दर्जा वाढवावा , अनेक एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा , प्रवाशांना रेल्वे क्रॉसिंग करण्यासाठी दादर तयार करावा या व अन्य मागण्या केल्या गेल्या . मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधीने हा तालुका दोन लोकसभा मतदार संघात विभागला गेल्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप झाला आहे व होतही आहे .

आता लवकरच दौंड मनमाड मार्गावर कोपरगाव ते राहुरी कोपरगाव ते नगर दुहेरीकरण राहुरी रेल्वे स्टेशनच्या मुळानदीवरील पुलाचे काम झाल्यावर सुरू होण्याची शक्यता आहे . त्यामुळे राहुरी रेल्वे स्टेशनला पुढील काळात काही ठोस निर्णय घेतल्यास महत्त्व प्राप्त होईल . परंतु आता रेल्वे स्टेशनवरील सर्वच व्यवसायावर त्याचा परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे .

दरम्यान , प्रयागराज येथील कुंभमेळ्यात कोट्यावधी भाविकांच्या सहभागानंतर आता 2027 मध्ये होऊ घातलेल्या नाशिक कुंभमेळ्याकडे प्रशासकीय लक्ष लागले आहे . राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यात जातीने लक्ष घातले आहे . राज्यातील महत्त्वाचे पाच ज्योतिर्लिंग , साईबाबांची श्रीक्षेत्र शिर्डी , शनिशिंगणापूर या सर्व धार्मिक क्षेत्र असल्याने मोठ्या प्रमाणात देशभरातील आणि देशाबाहेरीलही श्रद्धाळू कुंभमेळ्यासोबतच अन्य ठिकाणच्या दर्शनाची पर्वणी साधण्याची शक्यता आहे . प्रयागराज कुंभमेळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जातीने लक्ष घातले होते . प्रयागराज कुंभमेळा यशस्वी होताना देशभरातील कोट्यावधी भाविकांनी अयोध्या , काशी , मध्य प्रदेशातील उज्जैन , ओंकारेश्वर व अन्य अशा धार्मिक क्षेत्री व ज्योतिर्लिंग दर्शनासाठी गर्दी केली होती .

हे  ही महत्वाचे....


       ( राहू केतू शनी मंदिर , राहुरी . ) 

             (संग्रहित छायाचित्र )

राहुरी येथे दुर्मिळ असे राहू केतू शनी मंदिर असून राज्यासह बाहेरील भाविक मोठ्या प्रमाणात राहुरीत राहू केतू शनी मंदिरास दर्शनासाठी येऊन अभिषेक व अन्य धार्मिक कार्य करतात. नाशिक कुंभमेळ्याच्या निमित्ताने या भाविकांना देखील राहुरी येथील राहू केतू शनी मंदिर दर्शन व अभिषेक व अन्य उपासनेची संधी मिळणार आहे हे उल्लेखनीय आहे .

2027 नाशिक येथे कुंभमेळा होत आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंग फक्त महाराष्ट्र राज्यात असून अन्य धार्मिक क्षेत्र देखील भाविकांचा वर्षभर ओढा असतो . अशा धार्मिक ठिकाणी जाण्यासाठी रस्ते, रेल्वे , आणि विमान असे पर्याय आहेत. नगर जिल्ह्यात तिन्ही पर्याय असून शिर्डी हे मोठे रेल्वेचे प्रमुख केंद्र मानले जाते . त्या पाठोपाठ अहिल्यानगर , बेलापूर ( श्रीरामपूर ) , कोपरगाव , राहुरी ही रेल्वे स्टेशन प्रमुख मानली जातात . शिर्डी व शिंगणापूर यांच्या क्षेत्रांच्या मध्यवर्ती असलेली ठिकाण राहुरी असल्याने रस्ता रेल्वे हे दोन्ही मार्ग या सर्व क्षेत्रांना जाण्यासाठी सोपे असल्याने राहुरी हा विषय सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे .

Post a Comment

0 Comments