Type Here to Get Search Results !

राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 


 राहुरी  - ( प्रतिनिधी )

          राहुरी  विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आज मुंबईत विधान भवनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली , यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली .





                 मागील महिन्यात राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात पाठीच्या आजारामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली होती .




Advt -  [ राहुरी शहरात गाळा व हॉल भाड्याने अथवा योग्य भावात योग्य किंमत आल्यास विकणे आहे . संपर्क - 9022442716 : 9922358386 ]

 

 यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन कर्डिले यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता . ही वार्ता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झळकली होती . त्यानंतर कर्डिले यांनी नगरजवळील बुऱ्हानगर येथील आपल्या निवासस्थानी काही काळ घरी विश्रांती घेतली .


( Advt )


                  या दरम्यानच्या काळात आमदार कर्डिले यांना नगर - पाथर्डी - राहुरी तालुक्यातील अनेक भाजपा पदाधिकारी व समर्थकांनी भेट देत दिली होती . सध्या मुंबईत विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे . आमदार शिवाजी कर्डिले यांनी आज विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली . 

( Advt )

          या वेळी  मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत केली . मुख्यमंत्री व आमदार कर्डिले यांच्या भेटीचा फोटो समर्थकांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याने याबाबत दोघांच्या भेटीची सध्या चर्चा सुरू आहे .

Post a Comment

0 Comments