उद्यापासून श्री क्षेत्र नेकनूर येथे श्री कालिका देवीचा यात्रोत्सव
राहुरी - महेश कासार यांजकडून
सोमवंक्षीय क्षत्रिय कासार समाजाचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र निनगुर (नेकनुर ता जि बीड) येथील श्रीकालिका देवीचा (निनगुर माता) सुवर्ण महोत्सवी वार्षिक यात्रा उत्सव चैत्र शुद्ध १२ बुधवार दिनांक ९एप्रिल ते चैत्र शुद्ध पौर्णिमा शनिवार दि. १२एप्रिल २०२५ या कालावधीत विविध धार्मिक, समाजिक ,सांस्कृतिक उपक्रमांनी संपन्न होणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव काटकर, सचिव डॉ सोनाजीराव पाटील यांनी दिली .
यात्रा उत्सव काळात सकाळी ६ वा सप्तशती पाठ, सकाळी सात वाजता अभिषेक आरती, सकाळी ९ वा अल्पोपहार सायंकाळी सात वाजता आरती नैवेद्य, आराधना (महाप्रसाद) मुख्य दिवस चैत्र शुद्ध पौर्णिमा १२एप्रिल रोजी दुपारी ४ वा देवस्थानच्या वतीने समाज बांधवाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे .
सभेचे अध्यक्ष स्थानी पुणे कसबा विधानसभेचे आमदार श्री हेमंत रासने हे भूषविणार आहेत या प्रसंगी श्री दगडूशेठ गणपती टस्टचे अध्यक्ष सुनील रासने , जागतिक कासार संघटनेने अध्यक्ष अशोक दगडे आदिसह समाजातील विविध मान्यवर उपस्थित राहणार असून समाज प्रबोधन करणार आहेत
रात्री दहा वाजता श्रींच्या छबीना निघणार आसुन रात्री बारा वाजता शोभेच्या दारु कामाने यात्रेची सांगता होणार आहे कुलस्वामिनी श्री कालिका मातेच्या दर्शनाचा, महाप्रसादाचा लाभ घ्यावा , असे आवाहन राहुरी तालुक्यातील कासार समाजाच्या वतीने करण्यात आले आहे .


Post a Comment
0 Comments