राज्यातील धरणातील गाळ काढण्याचे धोरण पुन्हा - तारीख पे तारीख ? प्रयोगांवर प्रयोग ? आणि धोरणांवर धोरण ? असे तर नव्हे
विशेष वृत्त - सतर्क खबरबात जिल्ह्याची
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील महत्त्वाच्या धरणातील गाळ काढण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत अनेक निर्देश दिले. नवीन धोरण तयार करावे , प्रायोगिक तत्वावर गाळ मोहीम राबवावी , धरणातील गाळ काढण्याबाबत सुधारित धोरण तयार करावे , या व अन्य सूचना दिल्या आहेत. याबाबतची अंमलबजावणी कधी होते ? यावर प्रश्नचिन्ह कायम आहे .मुळा धरणक्षेत्रात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे .
आठ वर्षांपूर्वी 2017 - 18 मध्ये भाजपा- शिवसेना युतीच्या काळात राज्यातील महत्त्वाच्या धरणातील गाळ काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला होता . यात राज्यातील जायकवाडी (संभाजीनगर), गोसीखुर्द (भंडारा ), गिरणा (नाशिक), मुळा (नगर ), उजनी (सोलापूर ) या धरणातील गाळ करण्यासंदर्भात राज्यस्तरीय समिती घटना करण्याचे निर्देश दिलेले होते.
एवढेच नव्हे तर त्यानंतर 2018 व 2019 मध्ये नगर जिल्ह्यातील मुळा धरणातील गाळ काढण्यासंदर्भात निविदा देखील जाहीर करण्यात आली होती .
मात्र , हा विषय न्यायप्रविष्ठ झाला होता .
2020 या काळामध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. या शासन काळात तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये धरणामधील गाळ काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठन करत त्याचा अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. गठीत केलेल्या समितीने सर्वांकष माहिती व सर्वेक्षण केल्यानंतर 2022 अखेर हा अहवाल अंतिम टप्प्यात आला होता . त्यानंतर या अंतिम अहवालाची चर्चा मे 2023 मध्ये पुन्हा सुरू झाली होती .
अर्थात 2017 - 18 मध्ये राज्यातील महत्त्वाच्या धरणातील गाळ काढण्याचे धोरण हे
तारीख पे तारीख ....
प्रयोगांवर प्रयोग .......
आणि धोरणांवर धोरण .........
असाच आज अखेर आठ वर्षे सुरूच असल्याचे दिसून येत आहे . या सर्व घटनाक्रमामध्ये सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच नाव सध्या घेतली जात आहे .
1972 मध्ये निर्माण झालेल्या नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणात गेल्या 53 वर्षात शेकडो टीएमसी पाणी जमा झालेली आहे . आज अखेर अडीचशे टीएमसीहून अधिक पाणी मुळा नदीच्या मार्गाने संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाकडे वाहून गेलेले आहे .
या काळात धरणाकडे माती मिश्रित व वाळू मिश्रित गाळ अडीच ते तीन टीएमसी साचल्या असल्याचे निरीक्षण अनेकांनी केलेले आहे . मागील वर्षी नगर नाशिक जिल्ह्यात चांगल्या झालेल्या पावसामुळे जायकवाडीला पाणी देण्याची वेळ समन्यायी कायद्यामुळे आली नव्हती . यंदाच्या वर्षी देखील चांगला पाऊस होणार असल्याचे संकेत आहेत . तरीही जायकवाडीला पाणी देण्याची टांगती तलवार कायम आहे .
सध्या राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्याखालील शासन सत्तेवर असून त्यांच्या महत्त्वकांक्षी अशा जलयुक्त शिवार , गाळमुक्त अशा योजना वर पुन्हा लक्ष केंद्रित केले आहे . त्यातच नगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी धरणातील गाळ काढण्यासंदर्भात दिलेली माहिती म्हणजे तारीख पे तारीख ? प्रयोगांवर प्रयोग ? आणि धोरणांवर धोरण ? असे तर नव्हे , असा प्रश्न नगर जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रात विचाराला जात आहे .

Post a Comment
0 Comments