सर्व धर्म समभाव ", सात्रळ च्या सेंट पाद्रे पिवो इंग्लिश मिडीयम स्कूल ची आषाढी दिंडी
सात्रळ :- ( प्रतिनिधी )
येथील सेंट पाद्रे पिवो इंग्लिश मिडीयम स्कूल च्या बालगोपालांनी आषाढी एकादशी निमित्त काढलेली दिंडी उत्साहात पार पडली.
उत्कृष्ट नियोजन, पारंपरिक वेशभूषेतील बाल वारकरी या दिंडीचे आकर्षण होते.
सुंदर असा वेष परिधान केलेली श्री विठ्ठल रुख्मिणी, पांढरी टोपी, पांढरी वेशभूषा, हाती टाळ, मुखी विठ्ठल नामाचा गजर, पारंपरिक वेषातली साडी तील विध्यार्थिनी यांना सात्रळ चौकात सादर केलेले
विठूनामाचा गजर करीत रिंगण सोहळ्याने ग्रामस्थ्यांचे डोळ्याचे पारणे फेडले. आषाढी वारी दिंडीचे उत्कृष्ट आयोजन तसेच नियोजन
सेंट पाद्रे पिवो स्कूल चे प्रिन्सिपॉल फादर अस्मि दिमोटी तसेच फादर विल्सन रुमाव, फादर जस्टीन व शाळेतील शिक्षकवृंद यांनी केले. दिंडी सोहळा उत्कृष्टपणे सादरीकरण बद्दल तसेंच विध्यार्थी विध्यार्थिनीचे कौतुक ग्रामस्थ करत असल्याचे चित्र पाहवयास मिळाले.






Post a Comment
0 Comments