राहुरी पोलिसांच्या वतीने स्वातंत्र्यदिनी या शालेय विद्यार्थ्यांचा होणार सन्मान
राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने अमली पदार्थ विरोधी जनजागृती करिता घेतलेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर
राहुरी ( प्रतिनिधी )
दि. 26 जून 2025 रोजी अमली पदार्थ विरोधी दिनाच्या औचित्य साधून राहुरी पोलीस स्टेशन पुरस्कृत अमली पदार्थ जनजागृतीच्या दृष्टीने आंतरशालेय निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या .
सदर स्पर्धांमध्ये तालुक्यातील सुमारे 9 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता . शिक्षण विभाग पंचायत समिती मार्फत आज रोजी सदर स्पर्धेचा निकाल घोषित होऊन दोन्ही स्पर्धेमधील दोन्ही गटाच्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आली .
( सर्व प्रकारच्या औषधावरील संजीवनी ज्यूस साठी संपर्क - 8380091497 )
( सर्व प्रकारच्या औषधावरील संजीवनी ज्यूस साठी संपर्क - 8380091497 )
सदर गटातील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान स्वातंत्र्यदिनी तालुक्याच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमानंतर तहसीलदार नामदेव पाटील , पोलीस निरीक्षक संजय ठेंगे ,तसेच गटशिक्षणाधिकारी श्री मोहिनीराज तुंबारे यांच्या हस्ते होणार आहे .
( साई आदर्श मल्टीस्टेट संस्था )
सदरच्या स्पर्धा माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे , तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे , उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आल्या होत्या .
सदर बक्षीस वितरण कार्यक्रम हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे , अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी देवदत्त भवर यांच्या मार्गदर्शनात होणार आहे .






Post a Comment
0 Comments