साईबाबा आणि भारत मातेचा घोषाने राहुरीच्या सुकन्येची एव्हरेस्टला गवसणी ; द्वारका डोखे यांची साहसी यशोगाथा
राहुरी ( विशेष वृत्त )
जगातलं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट , जगातलं चौथं शिखर अतिशय खडतर माउंट ल्होत्से मोहिम फत्ते करणाऱ्या द्वारकाताई डोखे या खरोखरच ध्येयवेड्या रणरागिणी.
म्हणूनचं 'ध्येयवेडी द्वारका साद घालती हिमालय ' हे ब्रीद सार्थ व समर्पक ठरवणारी..
घरची परिस्थिती बेताची, ना कुणाचं पाठबळ, राजकीय , आर्थिक पाठबळ नाही, स्वतःच्या हिमतीवर आणि जिद्दीवर स्वतःचे स्वप्न साकार करण्यासाठी जीवाचे रान करणारी ही सहसवीर या मोहिमेचा कोणताही वारसा नसताना ही हिमालय झेप घेणारी ही सहसविरंगना. ध्येयवेडी माणसं कशी असतात याचा प्रत्यय या सहसवीर भगिनीने दाखविला.
उधार उसनवार करून, सख्ख्या भावाने मोठे कर्ज करून व स्वतःच्या नोकरीचा पगार या मोहिमेत लावून ध्येय जपणारी, वाढवणारी नि कृतीत आणणारी द्वारकाताई डोखे . प्रत्यक्षात मृत्यू समोर असताना आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणारी..
शिखराचा शिरोभाग अगदी अंतिम टप्प्यात असताना पुर्ण शरीर बर्फाच्या शितलहरीत संवेदनाहीन झालं तरी माझं लक्ष्य पुर्ण करायचयं या ध्येयाने यशोशिखरं पादाक्रांत करत, देशाचं पुर्ण राष्ट्रगीत सावधान परिस्थितीत म्हणत भारताचा जयजयकार करणारी द्वारकाताई.....
[संपर्क - कविता मैड- 9325402032]
कल्पनेच्याही पलीकडली, अशी अलौकीक सामर्थ्यशाली देशाची सुकन्या आपल्या तालुक्याचा, जिल्ह्याचा बरोबरच राज्य नि देशाच्या इतिहासाचा गौरवशाली घटक म्हणून उदयास येणं नक्कीच प्रेरणादायी आहे.
श्रीमती द्वारका भागीरथी विश्वनाथ डोखे, पोलीस निरीक्षक, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, नाशिक
वयाच्या ५० व्या वर्षी मानवी शरीरात खूप सारे बदल होत असतात. हाडांची झीज होवुन हाडे ठिसूळ बनतात अशा काळात एव्हरेस्ट मोहिमेचे स्वप्न पाहणे नक्कीच सोप नाही. पण वडिलांना श्रध्दांजली आगळीवेगळी द्यायची अशी खुणगाठचं त्यांनी निश्चित केली होती. त्यांचे वडील त्यांच्या आयुष्याचे खरे आदर्श होते.
सन १९९६ ला त्यांचे अपघाती निधन झाले. द्वारका या त्यांच्या वडिलांना आपल विश्व मानणारी कन्या, त्यांच्या नावासाठी जगावेगळ काहीतरी करण्याचा त्यांचा मानस होता. या संकल्पनेतूनच माऊंट एवरेस्ट मोहिमेची सुरूवात झाली. वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांनी गिर्यारोहणाला सुरुवात केली.
सन २०१६ (चन्द्रखानी), २०१७ (रूपकुंड), २०१८ (मेरा पिक) असा प्रवास चालु होता. सन २०२१ मध्ये महाराष्ट्र पोलीस प्रबोधीनीत त्यांची बदली झाली. तेथे सहाय्यक पोलिस निरिक्षक संभाजी गुरव यांच्या यशस्वी एव्हरेस्ट चढाईचा लेख दक्षता मासिकात वाचण्यात आला. त्यांच्याकडून माहिती घेऊन द्वारकताई यांनी मोहिमेची तयारी चालू केली. त्याकाळात महाराष्ट पोलीस दलातील पहिले एवरेस्टवीर रफिक शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले. त्यांची या एव्हरेस्ट चढाईची तयारी चालू असताना त्यांच्या आईचे निधन झाले. आई वडिलांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली द्यायची, या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन द्वारकताई तयारीला लागल्या.
सन २०२२ मध्ये एवरेस्ट मोहीमेसाठी अंदाजे ३२-३८ लाखांचा खर्च अपेक्षित होता. तो खर्च त्यांच्या आवाक्या बाहेरचा होता त्यामुळे त्यांनी देणगीदार शोधण्यात सुरुवात केली. त्यात बराच वेळ गेल्याने त्याचा परिणाम त्यांच्या सरावावर झाला. त्याच वर्षी एव्हरेस्ट मोहीमेसाठी गेल्या होत्या परंतु शरीराने साथ न दिल्यामुळे कॅम्प २ येथुन त्यांना परतावे लागले होते. परत आल्यानंतरही आई-वडिलांसाठीचे ते स्वप्न त्यांना शांत बसू देत नव्हतं. पुन्हा नव्या जोमाने तयारीला सुरुवात केली. यावेळी एवरेस्टवर यशस्वीपणे चढाई केलेल्या भारतातील अनेकांशी हितगुज करत त्यांनी योग्यरितीने तयारी चालू केली. त्यांचा दीड वर्षाचा खात्यावर जमा असलेला पगार, लहान भाऊ रामेश्वर याने काढलेले कर्ज तसेच मोठी बहीण सौ. सुरेखा पुंड यांनी तिचे दागिने गहाण ठेवून केलेली बहुमोल मदत या सर्वातून कशीबशी आर्थिक पूर्तता झाली. दोघे भावंड द्वारकताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन त्यांना मोहीमेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करण्याचे सांगत. पैसे जमवण्यासाठी होणारी ससेहोलपट त्यांनी टाळली होती. त्यानंतर ध्येय आणि जिद्द यांच्या जोरावर चढाईस प्रारंभ करून एव्हरेस्ट आपल्याला खुणावतेयं, या आत्मविश्वासावर वाटचाल सुरू झाली. या चढाई दरम्यान त्यांना अनेक संकटाना तोंड द्यावे लागले. चढाईत त्यांनी अनेक अपघात पाहिले, परंतू त्यांनी मागे पाहिले नाही .
ध्येयाने प्रेरित झालेलीच इतिहास घडवतात यावर त्यांचा दृढ विश्वास होता. ३ वर्षापासून अखंड परिश्रम घेतल्याचे स्वप्न अखेर पुर्णत्वास आले. जगाच्या सर्वोच्च शिखरावर उभे राहून जीवन सार्थक झाल्याची अनुभूती त्यांना होत होती. देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गायलेले राष्ट्रगीत माऊंट एवरेस्टच्या इतिहासात एक वेगळी नोंद करुन गेले. त्या टोकावर देशाचे राष्ट्रगीत अभिमानाने गाणारी द्वारकताई डोखे पहिलीवहीली भारतीय महिला बरोबरच महाराष्ट्र नि राज्याच्या पोलिस दलातीलही पहिली महिला ठरली. त्यांच्या या साहसाचा व तमाम भारतवासीयांना नक्कीच सार्थ अभिमान आहे.
कोणतीही आर्थिक सुबत्ता नसताना फक्त जिद्द, प्रचंड आत्मविश्वास, नि वडिलांसारखी अढळ वृत्तीच्या जोरावर जगातलं अत्त्युच्च शिखर सर करण्याचं धाडसं फक्त द्वारकाताई सारख्यांतचं असतं हेच नक्की. त्यांच्या या धाडसी मोहीमेचे प्रसिद्धी माध्यमांनी दखल न घेतल्याची खंत प्रकर्षाने जाणवल्याचे त्या आवर्जून सांगतात. अथवा कोणत्या राजकीय धुरिणांनीही शुभेच्छा देण्यापलीकडे मोहीमेला हातभार न लावल्याचं शल्य नक्कीच बोचत असल्याचेही प्रकर्षाने जाणवल्याचं त्यांचं म्हणणं दुर्लक्षुन चालणारं नाही. त्यांच्या शौर्याला शतशः नमन !!
( सौजन्य - बाळकृष्ण भोसले ( हौशी पत्रकार )

Post a Comment
0 Comments