Type Here to Get Search Results !

नामदेव समाजोन्नती परिषद - राहुरी तालुका अध्यक्षपदी प्रसाद नांगरे , उपाध्यक्ष सोपान धोंगडे तर समन्वयक अ‍ॅड. पल्लवी कांबळे

नामदेव समाजोन्नती परिषद -  राहुरी तालुका अध्यक्षपदी प्रसाद नांगरे , उपाध्यक्ष सोपान धोंगडे तर समन्वयक अ‍ॅड. पल्लवी कांबळे



नामदेव समाजोन्नती परिषदेचे पदाधिकारी यांचा अहिल्यानगर जिल्हा दौरा व समाज बांधव यांच्या बरोबर बैठक वृत्त.

बैठकीचे ठिकाण – श्री. संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर, मठ गल्ली, राहुरी, जिल्हा–अहिल्यानगर.



१) श्री संजय नेवासकर - नासप अध्यक्ष 

२) डॉ अजय फुटाणे - नासप सरचिटणीस 

३) श्री प्रविण शित्रे - नासप सचिव 

४) श्री रणजीत माळवदे - उपाध्यक्ष , नासप पुणे विभाग 

५) श्री महेश मांढरे - नासप संपर्क प्रमुख महाराष्ट्र 

६) श्री शैलेश धोकटे - नासप जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर

७) श्री संजय वैद्य - विश्वस्त शिंपी.  

     समाज रविवार पेठ पुणे.

  वरील सर्व पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.बैठकीत सुरवातीला श्री. धनंजय सुभाषचंद्र धोंगडे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. त्यात उपस्थित समाज बांधवांनकडून सर्व पदाधिकारी यांचे स्वागत आणि शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर श्री महेश मांढरे यांनी प्रस्तावना केली व परिषदेच्या कामा बद्दल माहिती सांगितली.त्यानंतर डॉक्टर अजय फुटाणे यांनी ना स प (नामदेव समाजोन्नती परिषद) चा इतिहास त्याची उद्दिष्टे सर्वांना समजावून सांगितली शिंपी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आपल्याला या माध्यमातून पोहचून त्याला कशाप्रकारे मदत करता येऊ शकते यावर चर्चा केली समाज कशाप्रकारे संघटित ठेवता येईल व त्यामाध्यमातून आपल्याला सरकारकडून विविध उपाययोजना किंवा योजना यांचा फायदा घेता येऊ शकतो याची सविस्तर माहिती सांगितली. संपूर्ण भारतात शिंपी समाजातील सर्व पोटजाती मिळून एकूण पाच कोटी इतकी शिंपी समाजाची लोकसंख्या आहे हे ही त्यांनी सांगितले, त्यानंतर ना स प चे अध्यक्ष श्री. संजय नेवासकर यांनी येत्या २८ सप्टेंबर रोजी श्रीरामपूर येथे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती व सर्वांना त्यासाठी निमंत्रित केले त्याचबरोबर पुढील वर्षी नागपूर येथे १८ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या शिंपी समाजाच्या आखिल भारतीय शिंपी समाजाच्या अधिवेशनाबद्दल सविस्तर माहिती सांगितली आणि त्यासाठी सर्व समाजाने उपस्थित रहावे असे आवाहन सर्वांना केले.नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आमंत्रित केले असून त्यांनीही उपस्थित राहण्याचा शब्द दिला आहे. प्रत्येक तालुक्यातील समाज्याच्या अडचणी परिषदेच्या माध्यमातून सोडविण्याचे आश्वासन सुद्धा यावेळी त्यांनी दिले.उर्वरित सर्व पदाधिकाऱ्यांचे पण खूप सुंदर मार्गदर्शन लाभले.

 यावेळी राहुरी तालुक्यातील शिंपी समाज उपस्थित होता त्यात श्री. मनोहर शंकरराव नांगरे, श्री.धनंजय सुभाषचंद्र धोंगडे सर, श्री. सुदेश सुबंध, श्री. सुनील धोंगडे, ह.भ.प. संजय महाराज धोंगडे, श्री. चंद्रशेखर राजेंद्र धोंगडे,श्री. संजय ढवळे सर, श्री . तारक राजेंद्र नेवासकर, श्री सोपान चंद्रकांत धोंगडे, श्री. ऋषिकेश संजय धोंगडे, श्री. प्रसाद मनोहर नांगरे, ॲड.पल्लवी कांबळे मॅडम, ऋषिकेश संजय ढवळे आदी समाज बांधव उपस्थित होते.

       बैठक झाल्यावर नामदेव समाजोन्नती परिषद राहुरी तालुका कार्यकारणी निवडीचे पत्र देण्यात आले.

नामदेव समाजोन्नती परिषद राहुरी तालुका कार्यकारणी 

श्री. प्रसाद मनोहर नांगरे. अध्यक्ष

श्री. सोपान चंद्रकांत धोंगडे. उपाध्यक्ष

श्री. धनंजय सुभाषचंद्र धोंगडे. सचिव

ॲड. पल्लवी कांबळे. समन्वयक

श्री. तारक राजेंद्र नेवासकर. संघटक

श्री. चंद्रशेखर राजेंद्र धोंगडे. सदस्य

कु. ऋषिकेश संजय ढवळे. सदस्य

श्री. ऋषिकेश संजय धोंगडे. सदस्य

श्री. सुदेश सुबंध. सदस्य

            उर्वरित सर्व समाजबांधव यांना सदस्य होण्यासाठी आवाहन ना स प चे अध्यक्ष श्री. संजय नेवासकर यांच्या कडून करण्यात आले व कार्यकारणीला पुढील कामासाठी शुभेच्छा त्याच्याकडून देण्यात आल्या.

सर्व बैठक अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.शेवटी श्री. धनंजय सुभाषचंद्र धोंगडे यांनी सर्व समाजाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments