मंगलकार्यालयातुन चोरी गेलेले ६ लाखांचे सोने मध्यप्रदेशातून हस्तगत ; २० दिवसात तपासपथकाने कारवाई केल्याने होतय कौतुक !!
राहुरी ( विशेष वृत्त )
राहुरी पोलिसांनी लाखो रुपयांचे चोरी गेलेले सोने मध्य प्रदेशातून वीस दिवसातच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीच्या गावात जाऊन हस्तगत केले . राहुरी पोलिसांचे या कारवाईने सर्वत्र कौतुक केले जात आहे .
फिर्यादी यांचेकडे नवरी मुलीचे सुमारे साडेपाच लाख रुपये किंमतीचे दागीने संभाळण्यासाठी ठेवले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरुन नेले आहे वगैरे मा फिर्यादीवरुन राहुरी पोलीस स्टेशन गुरनं 1194/2025 बीएनएस-303-2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रथम दर्शनी सदर गुन्ह्यामध्ये आरोपीतांनी गुन्हा करतांना कोणताही पुराना ठेवला नव्हता तपासामध्ये कोणताही पुरावा उपलब्ध नसतांना राहुरी पोलीसांनी अहोरात्र मेहनत करुन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच लग्न समारंभातील फोटो पडताळणी केली.
करुन तांत्रिक तपास करत असतांना त्याच दरम्यान अशाच प्रकारचे गुन्हे हे मध्य प्रदेश येथील राजगड जिल्ह्यातील पचोर तालुक्यातील कडीया साँसी या गावातील अशाच लोक हे अशाच गुन्हे पुर्ण देशामध्ये करत असुन तपासामध्ये प्राप्त झालेला फोटोच्या अनुषंगाने बोडा पोलीस स्टेशन मध्य प्रदेश येथे जावुन माहीती घेतली असता सदर सोने चोरीचा आरोपीचे नाव क्रिश सिकंदर सिसोदिया असे असलेची माहीती प्राप्त झाली पंरतु सदर ठिकाणी छापा टाकल्यास सदर आरोपीच्या घरातील तसेच गावातील इतर लोक हे पोलीस पथकावर हल्ला करतात. त्यामुळे स्थानिक पोलीस स्टेशन येथे जावून तेथील उप विभागतील पोलीसांच्या मदतीने सदर गावात मोठ्या फौज फाट्यासह धाडसी छापा टाकला असता सदर आरोपी हा मिळुन आला नाही त्याची आई अमिका सिकंदर सिसोदिया हिस चौकशी करता आरोपीताने चोरुन आणलेले लाखो रुपयांचे सोने विक्री करीता तीच्याकडे दिलेने असलेने चोरीस गेलेले सर्व सोने जप्त करण्यात आले आहे.
सदरची कामगीरी ही मा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे सो, अहिल्यानगर, मा अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे सो, श्रीरामपुर, मा उप विभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर सो श्रीरामपुर, पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली सपोनि सुदाम शिरसाट, सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते ,पोहेकॉ सुरज गायकवाड, पोना अशोक कुदळे, पोकों प्रमोद ढाकणे, पोकों योगेश आव्हाड, पोकों सतिष कु-याडे यांचेसह सायबर सेल श्रीरामपुर येथील पोहेकॉ संतोष दरेकर, पोना सचिन धनाड, पोना रामेश्वर वेताळ यांनी केली आहे.
तसेच याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते कि लग्न समारंभा त तसेच इतर कार्यक्रमामध्ये मौल्यावान वस्तु ह्या सुरक्षीत ठेवाव्यात .
शक्यतो ज्या मंगल कार्यालयात पुरेशी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहे तेथेच आपले नियोजित कार्यक्रम /मंगल विधी करावा .
तसेच पोलीस स्टेशन हद्दितील सर्व मंगल कार्यालय चालकांना यांना याद्वारे सुचित करण्यात येते कि आपले मंगल कार्यालयामध्ये सुरक्षेच्या आवश्यक त्या उपाया योजना राबवाव्यात . तसेच मंगल कार्यालयाचा परिसर व पार्किंग सीसीटीव्ही निगराणी खाली ठेवण्यात यावा . या पुढे ज्या मंगल कार्यालयामध्ये सीसीटीव्ही आढळुन येणार नाही अशा मंगल कार्यालयावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची दक्षता घ्यावी.




Post a Comment
0 Comments