Type Here to Get Search Results !

साई सुवर्ण भरारी सस्थेचा वतीने नारायण लोळगे यांना सुवर्ण कृषिरत्न पुरस्कार जाहीर

 साई सुवर्ण भरारी सस्थेचा वतीने नारायण लोळगे यांना सुवर्ण कृषिरत्न पुरस्कार जाहीर

 लोणी (प्रतिनिधी)

सुवर्ण भरारी संस्थेच्या वतीने कृषी विभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी श्री नारायण लोळगे साहेब यांना जाहीर करण्यात आला आहे त्यांच्या या सन्मानामुळे प्रवरा परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून समाजातील विविध स्तरातील मान्यवर शेतकरी आणि ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.



 संस्थापक अध्यक्ष श्रीमती सारिका ताई नागरे यांनी त्यांची निवड करताना सांगितले की लोळगे साहेब हे केवळ शासकीय अधिकारी नसून ते समाज क्षेत्रातील गोरगरीब शेतकरी आणि दुर्बल घटकाचे खरे हितचिंतक आहे त्यांनी नेहमीच मानवतेचा विचार अग्रस्थानी ठेवून कार्य केले आहे एक हात मदतीचा या संकल्पनेतून ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक कार्यक्रमाच्या मदतीस सर्वात अग्रस्थानी त्यांचे नाव असते त्यांनी कृषी क्षेत्रात अनेक संशोधन केले आहे सुवर्ण कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाला असुन, समाजातील अनेक समाज बांधव भगिणी यांनी नारायण लोळगे साहेब यांचे कौतुक करत अभिनंदन केले, 

*नारायण लोळगे साहेब अतिशय प्रेमळ स्वभावाचे आहेच गरीब विद्यार्थ्यांसाठी नेहमी त्यांचे मोलाचे सहकार्य असते ते नेहमी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सांगतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते आत्मसात केल्याशिवाय माणसाची दिशा ठरत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे विद्यार्थ्यांसाठी असलेली तळमळ त्यांच्यात नेहमी पाहायला मिळते राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख रवि माळवे यांनी व्यक्त केले, तसेच अहिल्या नगर जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे, जिल्हा सदस्य,सोमनाथ आहेर, मेज़र शेवंंते, गोकुळ चिंतामणी, अशोक काका मैड अर्जुन टाक, गुरुनाथ बोराडे, श्रीपाद बोकंद राहता तालुका प्रसिद्धीप्रमुख शंकर सोनवणे अनेकांनी शुभेच्छा दील्यात

तसेच श्री नारायण लोळगे साहेब हे शासनाच्या कृषी विभागात कर्तव्यदक्ष अधिकारी,शेतकरी यांचे कैवारी शेतकऱ्यांचे देवदूत आवडते अधिकारी म्हणून त्यांची प्रवरेच्या चाळीस गावात ख्याती आहे.कृषी रत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments