@100 मध्ये डॉ. हेडगेवारांच्या भूमिकेत हरीश बारस्कर ; छत्रपती शाहू विकास प्रतिष्ठानतर्फे भव्य गौरव सोहळा
संघाच्या शताब्दीच्या प्रवासातील तेजस्वी क्षण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीपूर्ती वर्षानिमित झी-5 या हिंदी वाहिनीवर ‘केसरिया@100’ ही विशेष डॉक्यु-सीरीज 12 डिसेंबरपासून आपल्यासमोर येत आहे .
या भव्य मालिकेत संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची प्रभावी भूमिका साकारली आहे . अहिल्यानगरचा बहुगुणी अष्टपैलू कलाकार हरीश देविदास बारस्कर यांनी.”
“या उल्लेखनीय कार्याचा गौरव… छत्रपती शाहू विकास प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सन्मान सोहळ्यात करण्यात आला.”
“जिल्हा संघचालक वाल्मिकजी कुलकर्णी, पालकमंत्र्यांच्या वतीने सौ. धनश्रीताई विखे पाटील, भाजपा शहरजिल्हाध्यक्ष अनिलजी मोहिते, आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष सीए राजेंद्र काळे यांच्या उपस्थितीत… हरीश बारस्कर यांचा गौरव करण्यात आला.”
“यावेळी… जयश्री भोंग–देशपांडे यांनी घेतलेली… कलाकार हरीश बारस्कर यांची खास प्रकट मुलाखत… उपस्थितांना भावूक करून गेली.”
“कार्यक्रमात अजित पंडित यांनी डॉ. हेडगेवारांच्या जीवनावर आधारित हृदयस्पर्शी गीत सादर केले… तर स्वागत, प्रास्ताविक, मार्गदर्शन आणि आभार यामधून… संपूर्ण सभागृहात ऊर्जादायी वातावरण पसरले.”
“या कार्यक्रमाला अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते… आणि मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने झाला.






Post a Comment
0 Comments