Type Here to Get Search Results !

स्थगित झालेल्या राहुरीतील त्या वार्डातील निवडणूक कार्यक्रम उद्यापासून

स्थगित झालेल्या राहुरीतील त्या वार्डातील निवडणूक कार्यक्रम उद्यापासून



राहुरी  ( प्रतिनिधी )

 राहुरी शहरातील प्रभाग क्रमांक दोन अ ( अनुसूचित जाती महिला ) या नगरसेवक पदासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी


 

डॉ .  पंकज आशिया यांनी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे .

 उद्या दि 4 डिसेंबर पासून नामनिर्देशन दाखल करता येणार आहे तर 10 डिसेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत नामंदर्देशनाचे मागे घेण्याचे अंतिम तारीख आहे . 


 20 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते दुपारी साडेपाच वाजेपर्यंत ( आवश्यक असल्यास ) मतदान घेण्यात येणार असून 21 डिसेंबर 2025 रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे . 

अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ . पंकज आशिया यांनी सदर सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे . न्यायालयीन आदेशामुळे राहुरी नगरपालिका जागा क्रमांक दोन अ मधील निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता . आता या जागेसाठी 20 डिसेंबरला मतदान होत आहे . 21 डिसेंबर रोजी च्या मतमोजणीमुळे वीस तारखेच्या या एका नगरसेवक पदासाठीच्या निवडणुकीकडे राहुरीकरांचे लक्ष लागले आहे .

Post a Comment

0 Comments