Type Here to Get Search Results !

या शेतकऱ्यांच्या खात्यावर एक कोटी दहा लाख रुपये जमा

या शेतकऱ्यांच्या खात्यावर एक कोटी दहा लाख रुपये जमा



 राहुरी ( प्रतिनिधी )

राहुरी तालुका खरेदी विक्री संघांचे गोदामात नाफेड , एनसीसीएफ व राज्य मार्केटिंग फेडरेशन यांचे संयुक्त विद्यमाने शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रात विक्रीसाठी आलेल्या १५२ शेतकऱ्यांचे २०६५ क्विंटल सोयाबीन चे पेमेन्ट १,१०,०२३२०/ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती तालुका खरेदी विक्री संघांचे चेअरमन युवराज सुधाकर तनपुरे यांनी दिली.

राहुरी तालुका खरेदी विक्री संघांचे वतीने नाफेड, एन सी सी एफ व राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने २०२५/२६ या वर्षीचे शासन मान्य खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेल्या सोयाबीन खरेदी विक्री केंद्र सुरु करण्यात आले होते.यासाठी शासनाने सोयाबीन साठी ५३२८रुपये क्विंटल भाव जाहीर केला होता. या हंगामात सोयाबीन खरेदी सुरु झाल्या पासून आज अखेर १५२ शेतकऱ्यांचे २०६५ क्विंटलचे पेमेन्ट १,१००२३२०/ रुपये शेतकऱ्यांचे खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती खरेदी विक्री संघांचे चेअरमन युवराज तनपुरे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments