Type Here to Get Search Results !

राहुरी उपनगराध्यक्षपदी गजानन सातभाई तर ..पहा या तिघांची झाली स्वीकृत नगरसेवक पदी निवड

राहुरी उपनगराध्यक्षपदी गजानन सातभाई तर पहा या तिघांची झाली स्वीकृत नगरसेवक पदी निवड



 राहुरी ( प्रतिनिधी )

राहुरी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी विकास आघाडीचे गजानन भागवत सातभाई यांची





आज बिनविरोध निवड झाली असून स्वीकृत नगरसेवक पदी विकास आघाडीचे डॉ . संतोष चंद्रकांतउदावंत ॲड . राहुल भैया महेंद्र शेटे तर विरोधी परिवर्तन आघाडी कडून नयन नवनित शिंगी यांची निवड करण्यात आली .

उपनगराध्यक्ष पदासाठी सकाळी ११ वाजता मुख्याधिकारी अभिजित हराळे उपस्थितीत प्रक्रिया सुरू झाली १ वाजे पर्यंत एकच अर्ज दाखल झाला .



गजानन सातभाई यांचा अर्ज दाखल झाला सूचक म्हणून गटनेता हर्ष तनपुरे होते . दुपारी दीड वाजता उपनगराध्यक्ष म्हणून गजानन भागवत सातभाई यांची निवड यावेळी जाहीर करण्यात आली .



नामनिर्देशित सदस्य पदासाठी अर्थात स्वीकृत नगरसेवक पदासाठी विकास आघाडी कडून डॉ . संतोष चंद्रकांत उदावंत व ॲड . राहुल महेंद्र शेटे यांची निवड जाहीर करण्यात आली, तर विरोधी परिवर्तन आघाडी कडून नयन नवनीत शिंगी यांची निवड जाहीर करण्यात आली .



यावेळी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी सहाय्यक म्हणून भूमिका पार पाडली .



यावेळी सत्ताधारी गटाचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे ,आघाडीचे गटनेता हर्षअरुण तनपुरे ,जेष्ठ नगरसेविका डॉक्टर उषाताई तनपुरे ,विरोधी भाजपाचे गटनेता राजेंद्र उर्फ चंद्रकांतउंडे ,नगरसेवक प्रतीक रावसाहेब तनपुरे , प्रशांत विजय डौले , प्रदीप भुजाडी , चेतन पोपळघट , सोन्याबापू जगधने , अविनाश मस्के सर, अरुण साळवे , संगीता शहाजी जाधव ,लता बाळू जाधव ,वृषाली नंदकुमार तनपुरे,आसमा आरिफ शेख , प्रियंका अमोल काशीद , सिंधुबाई सुभाष डावखर , प्रसन्न राजेंद्र वराळे, मनीषा संतोष बर्डे तसेच विकास आघाडी व भाजपा यांचे कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments