Type Here to Get Search Results !

राहुरीत या दोन युवा नेत्यांच्या व्हिडिओ पोस्ट होताहेत व्हायरल ! चर्चा फक्त पोटनिवडणुकीची

राहुरीत या दोन युवा नेत्यांच्या व्हिडिओ पोस्ट होताहेत व्हायरल ! चर्चा फक्त पोटनिवडणुकीची

 राहुरी ( प्रतिनिधी )

        एकीकडे राहुरी विधानसभा पोट निवडणूक बिनविरोध होणार याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे दोन युवा नेत्यांमध्ये सोशल मीडियावर चांगलाच मीडिया संघर्ष असल्याचे चित्र दिसून येत आहे .

    राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी येत्या 23 एप्रिल रोजी निवडणूक जाहीर झाली असून बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चेनंतर



राहुरीचीही पोटनिवडणूक बिनविरोध होणार या चर्चेला उधाण आलेले आहे . यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुरीत येऊन गेले , या काळात पडद्यामागील हालचाली झाल्या .



      तसेच माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राहुरीत वारंवार भेटी देऊन राहुरी विधानसभा निवडणुकी संदर्भात ट्विस्ट वाढवलेले दिसून आले .


 


त्यामुळे भाजपा मध्ये कोणता नेता प्रवेश करणार ? भाजपा कोणाला उमेदवारी देणार ? निवडणूक होणार की बिनविरोध होणार ? अशा चर्चा रंगल्या असताना
काही दिवसांवरच विधानसभा पोटनिवडणुकीची अधिसूचना येत असतानाच राहुरी तालुक्यात या प्रमुख दोन नेत्यांच्या सोशल मीडियावर रिल्स , स्टेटस , व्हिडिओ , अनेक कामांचे श्रेय , अशा मोठ्या प्रमाणात मीडिया व्हायरल होत आहेत .

कै . आमदार कर्डिले यांची सुपुत्र युवा नेता अक्षय कर्डिले आणि माजी मंत्री व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवा नेते प्राजक्त तनपुरे यांच्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत आहेत . त्यामुळे राहुरी विधानसभा पोट निवडणूक बिनविरोध होणार नाही ? या शक्यतेला मोठे बळ मिळत असल्याचे चित्र असून येत्या 23 एप्रिल 2026 च्या निवडणुकीसाठी युवा नेता प्राजक्त तनपुरे व अक्षय कर्डिले हेच उमेदवार असतील ! याला पुष्टी मात्र मिळत आहे . याबाबत सध्या सर्वत्र या व्हिडिओ पोस्ट व स्टेटस ची चर्चा सुरू आहे .



Post a Comment

0 Comments