गोमातेला राष्ट्रीय प्राणी घोषित करा , गोमातेचे होणारी कत्तल थांबवावी या साठी राहुरी तहसील कार्यालयात निवेदन
राहुरी ( प्रतिनिधी )
गोमातेला राष्ट्रीय प्राणी घोषित करा तसेच गोमातेचे होणारी कत्तल थांबवावी याकरिता राहुरी तहसील कार्यालयात आज निवेदन देण्यात आले.
या दरम्यान प्रकाश शेठ पारख, ललित चोरडिया, डॉ.जयंत कुलकर्णी,मधुकर घाडगे,ओंकार देशपांडे,रवींद्र थोरात, बंटी पटारे,योगेश सोलंकी,गौरव तनपुरे,साळवे संतोष उंडे,भारत मुसमाडे, आबा नाईकवाडे,पारस राका, श्याम भाऊ गोसावी,रवींद्र बलमे अनेक कार्यकर्ते तेथे हजर होते.
भारतात मोठ्या प्रमाणावर मास निर्यात केली जाते,
केंद्र सरकारने मास निर्यात करणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी,त्यांच्यावर निर्बंध आणावेत यासाठी केंद्र सरकारने पावले उचलायला पाहिजे असे प्रतिपादन केले.
शेतकऱ्यांनी गोवंश कसायांकडे न विकता त्याची पालन पोषण करावे कत्तलखान्यात जाऊ देऊ नये असे आवाहन शेतकऱ्यांना केले.
अशाच प्रकारचे निवेदन संपूर्ण भारतभरातून गोप्रेमींकडून प्रशासनाला देण्यात आले आहे काही महिन्यांनी यावर जर कारवाई झाली नाही तर आंदोलन छेडणार असल्याची माहिती ललित चोरडिया यांनी दिली.
ह.भ.प. अर्जुन महाराज तनपुरे यांनी नायब तहसीलदार साहेबांकडे सह्या केलेले निवेदन दिले.


Post a Comment
0 Comments