Type Here to Get Search Results !

गॅलेक्सी निसर्ग उपचार केंद्र प्रमुख डॉ. तन्वीर : पोलीस फॉरेन्सिक टीमकडून जाळलेली औषधे जप्त

 गॅलेक्सी निसर्ग उपचार केंद्राचा प्रमुख डॉ. तन्वीर : पोलीस फॉरेन्सिक टीमकडून जाळलेली औषधे जप्त



राहुरी ( प्रतिनिधी )

आरोपी तन्वीर हारुन देशमुख रा.प्लॅटीनम प्राईड औदुंबर कॉलनी ताठे मळा, सावेडी अहिल्यानगर, सध्या रा.बारागांव नांदुर ता.राहुरी याच्यावर राहुरी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेल्या गुन्हयाच्या तपासाबाबत आता राहुरी पोलिसांकडून नवी माहिती समोरआली आहे.


पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.12/05/2026 रोजी राहुरी पोलीस स्टेशन येथे आरोपी तन्वीर हारुन देशमुख प्लॅटीनम प्राईड औदुंबर कॉलनी ताठे मळा सावेडी जि.अहिल्यानगर सध्या रा.बारागांव नांदुर ता.राहुरी जि.अहिल्यानगर याने राहुरी शहरातील गॅलेक्सी निसर्ग उपचार केंद्र रोशन कॉप्लेक्स शेजारी नगर - मनमाड हायवे राहुरी ता.राहुरी जि.अहिल्यानगर या ठिकाणी महा.कौन्सिल ऑफ इंडियन मेडीसीन किंवा नॅशनल




कौन्सिलकड कुठल्याही प्रकारचे अधिकृत रजिस्ट्रेशन नसतांना किंवा मेडीकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट नुसार रुग्ण तपासणी किंवा त्यांना उपचार देण्याचा अधिकार नसतांना आरोपी तन्वीर देशमुख याने वेगवेगळया चिकित्सा पध्दतीचा वापर करुन रुग्णाच्या हिताला बाधक ठरतील असे औषध उपचार दिल्याचे सिध्द झाल्याने तसेच कायदया नुसार डॉक्टर या शब्दाचा गैरवापर केल्याचे सिध्द झाले आहे. 


तसेच सदर व्यक्तीने वैदयकीय व्यवसायाचे बनावट डिग्रीचे कागदपत्र तयार करुन सादर केले आहेत. तसेच मा.दिवाणी वरीष्ठ स्तर राहुरी जि.अहमदनगर यांच्याकडील रेग्युलर सिव्हील सुट नं. 365/2025 तन्वीर हारुन देशमुख विरुध्द महाराष्ट्र शासन यामध्ये दि.11/05/2026 रोजी मा.न्यायालयाने महाराष्ट्र मेडीकल प्रॅक्टीशन कायदा 1961 या कायदयामध्ये तन्वीर हारुन देशमुख याच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत. 

इतर तक्रारदार यांनी ही तक्रारी अर्ज केलेले असल्याने डॉ.गणेश बाबासाहेब मिसाळ वैदयकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय राहुरी ता.राहुरी जि.अहिल्यानगर यांनी चौकशीअंती राहुरी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारी वरुन राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नंबर 502/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 319(2),318(4),336(3),340(2) सह महा.वैदयकीय व्यवसाय अधिनियम 1961 चे कलम 34,36,38 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हे करत आहेत. 

सदर गुन्हयातील आरोपी तन्वीर हारुन देशमुख हा रुग्णांना उपचाराकरता वापरत असलेली औषधे बारागांव नांदुर रोड परिसरात जाळल्याची गोपनिय बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी पंचासमक्ष जावुन फॉरेन्सीक टिमच्या मदतीने सदर औषधे जप्त करण्यात आलेली आहे.

 गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पो.हे.कॉ.सतीष आवारे हे करत आहेत.  

 सदरची कारवाई मा.श्री.मुम्मका सुदर्शन सो. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री.सोमनाथ वाघचौरे अपर पोलीस अधीक्षक सो. श्रीरामपुर जि.अहिल्यानगर, श्री.जयदत्त भवर , उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि.अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर.ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पो.हे.कॉ. सतिष आवारे राहुरी पोलीस स्टेशन जि.अहिल्यानगर यांनी केलेली आहे.  

Post a Comment

0 Comments