Type Here to Get Search Results !

राहुरीच्या "त्या" तत्कालीन तहसीलदारावर निलंबनाची कारवाई ; पहा कारण आले पुढे

 राहुरीच्या "त्या" तत्कालीन तहसीलदारावर निलंबनाची कारवाई ; पहा कारण आले पुढे



सतर्क ( विशेष वृत्त )

सध्या गाजत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांना



निलंबित करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे .

अभिजीत भांडे हे राहुरी येथे वर्षभर तहसीलदार म्हणून कार्यरत होते . त्यामुळे राहुरीत याविषयी चर्चा रंगली आहे .



भोंदू बाबा खरात प्रकरणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानंतर भांडे यांना निलंबित करण्यात आल्याचे समोर आलेले असून उपजिल्हाधिकारी पदावर असणारे अभिजीत भांडे पाटील आणि भोंदू बाबा अशोक खरात यांच्यातील संबंध व दुरध्वनीवरील संपर्क झाल्याचे सांगितले जाते . त्यांच्यात काही व्यवहार असल्याचेही बोलले जात असून भांडे पाटील यांच्यावर नियम 1979 अंतर्गत विभागीय चौकशी सुरू करण्याचेही आदेश असल्याचे वृत्त आहे .

 विशेष म्हणजे अभिजीत भांडे पाटील हे तहसीलदार असताना राहुरी येथे 24 मार्च 2009 ते 23 मार्च 2010 या वर्षभराच्या कालावधीत कार्यरत होते . या काळात त्यांनी राहुरी तहसीलदार कार्यालयासमोरील तहसील निवास येथे आपल्या मुलाचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला होता . त्यावेळी संबंधित वाढदिवसाची चर्चा राहुरी तालुक्यासह जिल्ह्यात चर्चिली गेली . या वाढदिवस सोहळ्यात अनेक नामांकित प्रथितयश मान्यवर उपस्थित होते .

सध्या भोंदू बाबा खरात प्रकरणी सर्वत्र चर्चा असताना राहुरीत अभिजीत भांडे पाटील वर्षभर कार्यरत होते . त्यामुळे चर्चेला रंगत आल्याचे चित्र दिसून येत आहे .

Post a Comment

0 Comments