राज्यातील प्रमुख धरणांमध्ये 76% पाणीसाठा तर मराठवाड्यात मात्र केवळ 48% साठा ; पावसाची प्रतीक्षा कायम
सतर्क - ( विशेष वृत्त )
*दि.९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यातील प्रमुख धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा सुमारे ७६.०१%*
*मात्र छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा )मात्र ४८.२५%*
*नागपूर व अमरावती विभाग देखील अपेक्षा पेक्षा मागे---उत्तर आहिल्या नगर मध्ये समाधान कारक मात्र दक्षिण अहिल्यानगर मध्ये चिंताजनक पाणीसाठा*
*जोरदार पावसाची प्रतिक्षा*
- इंजि. हरिश्चंद्र. र चकोर
♦️*सद्यस्थितीमध्ये जलसाठा करण्यात येत असलेल्या राज्यातील ३०३२ प्रमुख मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा हा दि.०९ सप्टेंबर २०२६ सुमारे ७६.०१%टक्के म्हणजेच १०९५.५५७ टी.एम.सी. इतका झाला असल्याची माहिती जलसंपत्ती अभ्यासक व सेवा निवृत्त अभियंता इंजि. हरिश्चंद्र र. चकोर यांनी आमचे वार्ताहराशी बोलताना दिली.*
♦️*पुढे बोलताना इंजि. चकोर यांनी सांगितले की गतवर्षीच्या दि.०९ सप्टेंबर २०२५ रोजी राज्यातील उपयुक्त पाणीसाठा हा ८५.८४% म्हणजेच १२३७.२४० टी.एम.सी. इतका होता. मात्र या वर्षी तो साधारणतः९.८३%(१४१.६८३ टीएमसी )इतका कमी असला तरी अजूनही पावसाळा कालावधी शिल्लक असल्याने रिटर्न मान्सून मुळे निश्चितपणे सर्व धरणे १००% टक्के भरतील अशी शक्यता नक्कीच वाटते.*
*राज्यातील सहा(6) महसुली विभागातील धरणे व पाणीसाठा खालील प्रमाणे आहे.*
*१) नागपूर(३८७ धरणे)---१०९.९१५ टीएमसी (६५.९५%)*
*२) अमरावती(२७७ धरणे)- ---८८.००१ टीएमसी (६३.६४%)*
*३)छ.संभाजीनगर(मराठवाडा ९२९धरणे)------१२४.४०५ टीएमसी (४८.२५%)*
*४) नाशिक(५३९ धरणे) ----१७०.८१३ टीएमसी (८१.२१%)*
*५) पुणे(७२६ धरणे) ----४८४.०४२ टीएमसी (८९.९३%)*
*६) कोकण(१७४ धरणे )---११८.३८० टीएमसी (९१.५०%)*
*♦️राज्यात सर्वात जास्त उपयुक्त पाणीसाठा हा कोकण विभागात ९१.५०%असून त्या खालोखाल पुणे विभागात ८९.९३% आहे. मात्र त्याचबरोबर सर्वात कमी पाणीसाठा मराठवाडा विभागात(४८.२५%) इतकाच असल्याने ही बाब नक्कीच चिंताजनक वाटते*
♦️*त्याचबरोबर नागपूर आणि अमरावती विभागात देखील ६५% पर्यंतच उपयुक्त पाणीसाठा असल्याने जोरदार पावसाची अत्यंत आवश्यकता आहे*
*♦️मात्र मराठवाडा व अहिल्यानगर जिल्ह्यासाठी संजीवनी असलेल्या जायकवाडी धरणातील एकूण पाणीसाठा हा(९४.२०७ टीएमसी ( ९१.७०%) इतका झाला आहे .आतापर्यंत जायकवाडी धरणामध्ये सुमारे ६५.८५० टी.एम.सी. इतकी नवीन पाणी आवक असून जायकवाडी धरण जवळपास शंभर टक्के भरले असून आतापर्यंत जायकवाडी धरणामधुन सुमारे ५.७९० टी.एम.सी. इतके पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायदा-२००५ मधील तरतुदी नुसार जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 65% टक्के म्हणजेच 50 टी.एम.सी. च्या पुढे गेल्याने अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यांतील धरण समुहांमधुन पाणी सोडण्याची आता आवश्यकता राहिली नसल्याने निश्चितच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे आणि समाधानकारक वातावरण आहे.*
*♦️सद्यस्थितीत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या प्रमुख १३ प्रकल्पांमध्ये सुमारे ४६.८६२ टी.एम.सी.(७९.८९%) इतका एकूण पाणी साठा झाला असून तो गतवर्षीपेक्षा ४.०६० टी.एम.सी.(६.९२%) इतका कमी आहे* .
*♦️विशेष म्हणजे उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्प जवळपास ( भंडारदरा, निळवंडे, मुळा,आढळा) पूर्ण क्षमतेने भरलेले असून दक्षिणेतील सीना, खैरी , मांडोहोळ,घाटशीळ पारगाव या प्रकल्पां मध्ये मात्र सरासरी सुमारे ३३% टक्के इतकाच पाणीसाठा झालेला असल्याने निश्चितपणे चिंतेची बाब आहे, परंतु यापुढे शिल्लक पावसाळ्यामध्ये व परतीच्या पावसामुळे नक्कीच सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरतील अशी खात्री बाळगायला हरकत नसल्याचे मत इंजि. हरिश्चंद्र चकोर यांनी व्यक्त केले आहे*
*मात्र सद्यस्थितीत संपूर्ण अहिल्या नगर जिल्ह्यासह राज्यात पावसाची जोरदार प्रतीक्षा आहे*
*♦️महत्त्वाचे म्हणजे यावर्षी महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघर येथे आजपर्यंत ४४०८ मिमी इतका पाऊस (मात्र गतवर्षीपेक्षा ४९४ मीमी ने कमी) झाला असून सर्वात कमी पाऊस अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथे १४० मि.मी. इतकाच नोंदवला गेलेला आहे, परंतु अजूनही पावसाळा शिल्लक असल्याने पर्जन्यमानात वाढ होऊ शकते.*
*♦️अहिल्यानगर जिल्ह्यातील आजचे धरण एकूण पाणी साठे खालीलप्रमाणे*
*१)भंडारदरा--- ११.०३९ टीएमसी (१००%)*
*२)निळवंडे ----८.२७६ टीएमसी (९९.३०%)*
*३)मुळा ---२३.७०१ टीएमसी (९१.१६%)*
*४)आढळा---१.०६० टीएमसी (१००%)*
*५)सीना----०१.१०६ टीएमसी (४६.०८%)*
*६)खैरी----००.०८८ टीएमसी (१६.५३%)*
*७)मांडोहोळ--००.०७० टीएमसी (१७.५२%)*
*८)घाटशीळ पारगाव ---००.०४६ टीएमसी (१०.५३%)*
*९) विसापूर ---००.६४७ टीएमसी (७१.५२%)*
*१०) पिंपळगाव खांड---००.६०० टीएमसी (१००%)*
*♦️दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्यातील क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळवून देणार्या पुणे जिल्ह्यातील घोड धरणासह कुकडी प्रकल्प धरणसमुहांमध्ये (८ धरणे )देखील २७.३६५ टीएमसी (९२.२१%)पाणीसाठा झाला असल्याने निश्चितपणे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.*
*मात्र सीना, खैरी, घाटशीळ पारगाव, मांडोहोळ, विसापूर इत्यादी धरणांमध्ये मात्र ते ३३% टक्केच पाणीसाठा आहे*
*♦️एकंदरीत सद्यस्थितीमध्ये गेल्या पंधरा दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने पूर्ण उघडीप दिल्यामुळे उभ्या असलेल्या पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. येत्या आठ दिवसांमध्ये पुरेसा पाऊस न पडल्यास खरीप हंगाम वाया जाण्याची भीती देखील निर्माण झाल्याचे चित्र आहे.*
*संपूर्ण राज्यात पावसाने विश्रांती घेतल्याने विशेष करून मराठवाडा, नागपूर आणि अमरावती विभागात शेतकऱ्यांमध्ये निश्चितपणे चिंतेचे वातावरण पाहावयास मिळत आहे*
*♦️तसेच संगमनेर तालुक्यातील निमोण- तळेगाव दुष्काळी भागासाठी काही अंशी उपयुक्त असलेल्या भोजापूर धरणांमध्ये देखील शंभर टक्के (१००%)पाणीसाठा झालेला असून सद्यस्थितीत ओव्हर फ्लो चे पाणी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेशाने व संगमनेर विधानसभेचे आमदार श्रीमान अमोल खताळ पाटील यांच्या प्रयत्नांतून लाभ क्षेत्रातील आणि निळवंडे धरणाचे पाण्या पासून वंचित राहिलेल्या गावांमधील ल.पा.तलाव पाझर तलाव, काँक्रीट व दगडी बंधारे भरून देण्यासाठी सोडण्यात येत असल्याचे शेवटी इंजि.हरिश्चंद्र चकोर यांनी आवर्जुन3 सांगितले*
*तसेच आज पावतो भोजापुर धरणातून सुमारे अंदाजे ७७२ द.ल.घ.फु इतके पाणी कालव्याद्वारे ल.पा.तलाव, पाझर तलाव, गावतळे, दगडी व काँक्रीट बंधारे भरून देण्यासाठी सोडण्यात आलेले आहे.*ही मोठी समाधानाची बाब दिसून येत आहे*
.♦️*तसेच नुकताच राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगरचे पालकमंत्री मंत्री नामदार डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाने दमणगंगा- वैतरणा- गोदावरी नदी जोड प्रकल्पामध्ये सिन्नर तालुक्या बरोबरच संगमनेर तालुक्यातील दुष्काळी निमोण- तळेगाव विभागातील( २७ गावांमधील ३७ तलाव भरून देण्याच्या समावेशाने) वंचित क्षेत्र सुध्दा समाविष्ट करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे सांगून इंजि. हरिश्चंद्र र चकोर यांनी नामदार डॉ .राधाकृष्ण विखे पाटील साहेब मंत्री जलसंपदा महाराष्ट्र राज्य व संगमनेर तालुक्याचे आमदार श्रीमानअमोल खताळ पाटील यांचे आभार मानले आहेत*
*♦️पुणे शहराला पाणी पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण समूहांमध्ये यावर्षी १००% पाणीसाठा म्हणजेच २९.१५ टी.एम.सी.-- १००%) इतका झालेला असल्याने पिण्याचे पाण्याचे संकट टळले असुन शेती सिंचनाची चिंता देखील जवळपास मिटलेली आहे*.
*♦️नाशिक नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये यावर्षी सुमारे ९५.१३%(४८.०१४ टीएमसी )उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला असून गतवर्षीपेक्षा तो २.९०% (१.४६२ टीएमसी)इतका कमी आहे .मात्र उर्वरित कालावधीमध्ये नक्कीच पाणी साठा शंभर (१००%)टक्के होईल. तसेच जुलै /आगस्ट महिन्यात पडलेल्या उत्तम सरासरी पर्जन्यमानामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग गोदावरी नदी पात्रांमध्ये सोडावा लागलेला आहे .*
*♦️नाशिक जिल्हा धरण समूहांमधून नांदूर मधमेश्वर बंधारा येथुन गोदावरी नदी पात्रात सुमारे ५६.१७७ टी.एम.सी. इतका पाणी विसर्ग जायकवाडी धरणाकडे सोडण्यात आलेला आहे.*
♦️*तसेच नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्यत्वे*गंगापूर धरणात--५.६३० टीएमसी(१००%)* *आणि*
*दारणा धरणामध्ये--७.०६० टीएमसी (९८.७६%) इतका तसेच*
*कडवा --१.६०६ टीएमसी (९५.१४%)*
*भोजापुर --००.३३७ टीएमसी (९३.३५%)उपयुक्त पाणीसाठा झालेला असल्याने सद्यस्थितीत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही व तसेच सिंचन क्षेत्रासाठी देखील मोठा दिलासा मिळाला आहे*.
*♦️राज्यातील सर्वात मोठा जलसाठा असलेले उजनी धरण( एकूण --११७.१७० टीएमसी) ९९.९४%जवळपास शंभर टक्के भरले असून त्या खालोखाल कोयना धरणामध्ये एकूण पाणीसाठा १०४.९३ टीएमसी (९९.६८%) टक्के इतका झालेला आहे.*
*♦️राज्यात सर्वात जास्त पाऊस मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे ७२५७ मि.मी.इतका पडलेला आहे आणि सर्वात कमी पाऊस अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथे १४० मी.मी.इतकाच नोंदविण्यात आला आहे.*
*सद्यस्थितीत गिरणा धरण जवळपास(१८.३२० टीएमसी )९९ %भरले असून त्याचबरोबर हतनूर व वाघुर धरणांमध्ये देखील उत्तम (६५%,) पाणीसाठा झालेला आहे.*
♦️*सद्यस्थितीत विदर्भ, अमरावती व मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाचे प्रमाण आता तरी असमाधानकारक असल्याचे दिसून येत असून पाणी साठ्याचे प्रमाण सरासरी ६४.६५% इतकेच आहे*.
*♦️मराठवाड्यात जायकवाडी वगळता प्रमुख असलेले दहा (१०) धरणांमध्ये सरासरी ३६% टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा झालेला असल्याने ही बाब नक्कीच चिंताजनक आहे.*
*♦️सद्यस्थितीत पेंच(२०.३५ टीएमसी --५६.६७%)व गोसीखुर्द धरणांमध्ये १९.५५० टीएमसी --७४.७८)% इतका म्हणजे साधारणतः६६% टक्क्यापर्यंत पाणीसाठा झाला असल्याचे दिसून येत आहे*.
♦️*कोकण प्रदेशातील जवळपास सर्व धरणे भरली असून मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या (5) पाच ही धरणांमध्ये मध्ये १७.२९ टीएमसी ( सुमारे:९७.३०%) टक्के पाणीसाठा झालेला आहे. व त्याचबरोबर ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बारावी धरणात देखील(११.९७ टीएमसी )१००% पाणीसाठा झाला असून नवी मुंबई आणि पनवेल शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हेटवणे धरणात देखील महत्तम पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.*


Post a Comment
0 Comments