इस्कॉन राहुरीच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
राहुरी ( प्रतिनिधी )
इस्कॉन राहुरीच्या माध्यमातून दरवर्षी भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव साजरा केला जातो.
यावर्षी देखील रविवार दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी या कार्यक्रमाचे आयोजन पांडुरंग लॉन्स व मंगल कार्यालय या ठिकाणी करण्यात आले .
यानिमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भगवान श्री राधाकृष्ण यांचा अभिषेक तसेच प्रवचन, दर्शन ,नाम संकीर्तन व सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी राहुरी पंचक्रोशीतील अनेक भक्तवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंढरी मंगल कार्यालयात
( संपर्क रविन्द्र जगताप - 8605407030 )
( सिद्धार्थ जगताप - 9225260710 )
इस्कॉन पुणे येथून आलेले श्रीमान आमशुप्रभू यांनी उपस्थितांना श्रीकृष्ण लीलांविषयी प्रवचन दिले आपल्या प्रवचनांमध्ये प्रभुजींनी भगवान श्रीकृष्णांची सहा ऐश्वर्य उपस्थितांना समजावून सांगितले. तसेच भगवंतांच्या दिव्यलीलांचे व दिव्य कर्माचे वर्णन केले. यावेळी इस्कॉन राहुरीच्या भक्तांनी सुंदर अशी गोवर्धन पर्वताची रचना करून त्यामध्ये राधाकुंड व श्याम कुंड याची देखील रचना केलेली होती .उपस्थितांचे याकडे लक्ष वेधून घेतले.
इस्कॉन अहिल्यानगरचे सन्माननीय अध्यक्ष श्रीमान गिरीवरधारी प्रभुजी यांच्या नेतृत्वाखाली श्रीकृष्ण जन्माष्टमी महा महोत्सव अतिशय उत्साहाने पार पडला. श्रीमान गिरीवर धारी प्रभुजींनी श्रीमान आमषु प्रभुंचे आभार मानले. पांडुरंग लॉन्स व मंगल कार्यालयाचे मालक श्री हर्षल शेटे यांनी आपले कार्यालय या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देवून विशेष सहकार्य केले. तसेच श्री सुदेश बोरुडे यांनी सर्व डेकोरेशन, साऊंड सिस्टिम व एलईडी स्क्रीन विनामूल्य उपलब्ध करून दिले.
अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.श्रीमान साधुकृपा प्रभुजी, श्रीमान राघवचरण प्रभुजी , श्रीमान मधुसूदन प्रभुजी ,श्रीमान पंकज नेत्र प्रभुजी ,श्रीमान वृषभदेव प्रभुजी,डॉ. सिनारे सर आणि सिनारे मॅडम, डॉ. निमसे, डॉ. गणेश वाल्हेकर, डॉ. वालझाडे, डॉ. राजेंद्र नेहे, डॉ. भंडारी सर आणि भंडारी मॅडम, राहुरी नगरपालिकेचे सी.ओ. श्री ज्ञानेश्वर ठोंबरे सर, माजी उपनगराध्यक्ष श्री भिकूशेठ भुजाडी ,डॉ. कवडीवाले राजेंद्र, डॉ.संतोष बांगर, एडवोकेट गागरे, डॉ. रविकिरण वने, डॉक्टर प्रीतम चुत्तर , श्री संभाजीराजे तनपुरेहे उपस्थित होते. दोन ते तीन हजार भक्तांनी यावेळी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर प्रताप गिरगुणे तसेच श्रीमान अनंत नित्यानंद प्रभुजी, श्रीमान दुलाल गोपीनाथ प्रभुजी, श्रीमान गंभीरातीर्थ प्रभुजी, श्रीमान रसराज माधव प्रभुजी व इस्कॉन राहुरीचे सर्व भक्तवृंद यांनी विशेष सहकार्य केले. सूत्रसंचालन श्रीमान मुकुंद प्रभुजी यांनी केले. श्रीनिवास खर्डे यांनी उपस्थितांचे आभार मानले.









Post a Comment
0 Comments