Type Here to Get Search Results !

पुढील निवडणूका जोमाने लढवू ; प्राजक्त तनपुरे पुन्हा येणार ॲक्शन मोडवर

पाच  वर्षात  कमावलेली  माणसं  हीच  माझी  संपत्ती  ;  जिल्हा  परिषद , नगरपालिका  निवडणुका  जोमाने  लढू          - मा. आमदार  प्राजक्त  तनपुरे 


प्राजक्त तनपुरे पुन्हा येणार ॲक्शन मोडवर

राहुरी ( प्रतिनिधी )

राहुरी विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून काम करताना पाच वर्षात मी माणसं कमवलेली आहे , हीच माणसं माझी संपत्ती असून


    हीच ऊर्जा येणाऱ्या काळात आपण पुढे नेणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीत केले .



विधानसभेच्या निकालानंतर तनपुरे यांनी राहुरीत समर्थकांसाठी आभार मेळाव्याचे आयोजन केले होते . या मेळाव्याला मोठ्या संख्येने राहुरी नगर पाथर्डी तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते , पदाधिकारी , स्थानिक आघाडीचे कार्यकर्ते व तनपुरे समर्थकांची उपस्थिती दिसून आली . 

या आभार मेळाव्याप्रसंगी माध्यमांशी बोलताना माजी आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की , गेल्या पाच वर्षात अविरत कष्ट करून लोकांचे काम करण्याची संधी मला मिळाली , जात-पात धर्म कधी पाहिला नाही . आज अपेक्षा नव्हती की , इतक्या मोठ्या संख्येने आभार मेळाव्यासाठी लोक येतील . निवडणुकीत काही चुकले असतील किंवा कुठे कमी पडलो असेल त्याचे निश्चितच आपण आत्मचिंतन करतोय असे म्हणत श्री तनपुरे म्हणाले की , प्रत्येक निवडणुकीचे विषय वेगवेगळे असतात .

 लोकसभेच्या वेळी वेगळा तर विधानसभेच्या वेळी वेगळा विषय असल्याने आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले . कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्या समाधानासाठी आपण ईव्हीएमची पडताळणीची मागणी केल्याची ही त्यांनी सांगितले. लोकसभेच्या वेळी भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदारांनी 21 लाख रुपये खर्चून इव्हीएमची पडताळणीची मागणी केली होती , असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला .

पुढील काळात जिल्हा परिषद , पंचायत समिती व स्थानिक नगरपालिकेसाठी चांगली तयारी व उमेदवार देऊन पुन्हा एकदा जोमाने लढत देऊ असा विश्वासही प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला . तनपुरे विधानसभेत पराभवाला सामोरे गेल्यानंतरही राहुरीत आभार मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने आलेली समर्थकांची गर्दी चा विषय सध्या चर्चेला जात आहे .

Post a Comment

0 Comments