Type Here to Get Search Results !

श्रीक्षेत्र शिर्डी ते कर्‍हाड साईपालखीचे उद्या राहुरीत आगमन

 श्रीक्षेत्र शिर्डी ते कर्‍हाड साईपालखीचे उद्या राहुरीत आगमन



राहुरी  - बाळकृष्ण वाघ ( उपसंपादक )

 श्रीदत्तजयंती निमित्त सालाबादप्रमाणे यंदाही श्रीक्षेत्र शिर्डी ते कर्‍हाड श्रीसाईबाबा पालखीचे रविवार, दि.१ डिसेंबर रोजी राहुरी शहरात आगमन होत आहे .



गेल्या २४ वर्षांपासून कर्‍हाड ते श्रीक्षेत्र शिर्डी साई पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते.



 दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या पालखीचे राहुरी शहरात भव्य स्वागत होणार असून साई पालखीची राहुरी शहरातून सवाद्य भव्य मिरवणूक निघणार आहे. तद्नंतर राहुरी येथील युवानेते रवीभाऊ आहेर यांच्या मल्हारवाडी रोड, सातपीरबाबा दर्गाह समोरील निवासस्थानी पालखीचे स्वागत करण्यात येऊन मध्यान्ह आरती होईल. व तद्नंतर साईभक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.


तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त साईभक्तांनी सहभागी होऊन साईपालखी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन साईभक्त उद्योजक रवीभाऊ आहेर, राजेंद्र आहेर व साईभक्त मंडळ राहुरी यांचेवतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments