Type Here to Get Search Results !

प्रयागराज येथील पॉलिथिन मुक्त कुंभमेळासाठी संघ दक्ष ; "थाली-थैली अभियान" राबवणार

 प्रयागराज येथील पॉलिथिन मुक्त कुंभमेळासाठी संघ दक्ष ; "थाली-थैली अभियान" राबवणार



टीम खबरबात - विशेष वृत्त

येत्या मकर संक्रांती पासून प्रयागराज ( इलाहाबाद ) येथे सुरू होणाऱ्या महा कुंभ मेळ्यात प्रदूषण व पॉलिथिन मुक्त कुंभमेळा होण्यासाठी पर्यावरण संरक्षण गतिविधि द्वारे "थाली-थैली अभियान" राबविण्यात येणार असून पश्चिम महाराष्ट्र प्रांतातून एक लाख थाळी व कापडी पिशवी साठी योगदान दिले जात आहे . 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत हे योगदान स्वीकारले जाणार असल्याचे सांगण्यात येते .



बारा वर्षानंतर येत्या मकर संक्रांति 14 जानेवारी 2025 पासून महाशिवरात्री 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत प्रयागराज येथे महा कुंभमेळा होत आहे . 


या कुंभमेळ्यासाठी देशभरातूनच नव्हे तर अन्य अनेक देशातून 40 कोटीच्या आसपास भक्त येण्याचे अनुमान व्यक्त केले जात आहे .



कुंभमेळ्यामध्ये प्रतिदिवशी बाराशे टन कचरा जमा होण्याची शक्यता लक्षात घेता हा कुंभमेळा पॉलिथिन मुक्त होण्यास करिता पर्यावरण संरक्षण गतीविधी ( राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ) ने पूर्ण इको विजन फाउंडेशन च्या सहयोगातून "थाली-थैली अभियान" राबविण्यात येत आहे . 


या महाकुंभात सामील होणाऱ्या भक्तांसाठी भोजनाचे ताट व कापडी पिशवी वापरण्यासाठी देण्यात येणार आहे .

 पश्चिम महाराष्ट्रातील पर्यावरण संरक्षक गतीविधी व पूर्ण फाउंडेशन च्या माध्यमातून एक लाख थाळी व कापडी पिशवी देण्याचे नियोजन असून फाउंडेशन फाउंडेशन च्या वतीने दिलेल्या लिंक वर प्रतिव्यक्ती 125 रुपये असे दान द्यावे , असे आवाहन करण्यात आले आहे .

१४४ वर्षानंतर प्रयागराज येथे महा कुंभमेळावा होत आहे.महाकुंभ पर्यावरणपूरक होण्याकरिता, पर्यावरण गतीविधीने संपूर्ण भारतामधून/परदेशातून,१ स्टील थाळी+१ कापडी पिशवी पाठवण्याचे ठरिविले आहे.त्या करिता १ थाळी व १ कापडी पिशवी करिता ₹१२५ किंवा याच्या पटीत कृपया ऑनलाईन पद्धती ने दान करावे.रक्कम देण्याची शेवटची तारीख ३०/११/२४ आहे.


१ स्टील थाळी+१ कापडी पिशवी करिता ₹१२५ किंवा याच्या पटीत दान करावे .


१ थाळी आणि १ थैली करिता देणगी लिंक 👇🏻

 उत्तर नगर जिल्हा पर्यावरण गतिनिधी


https://pages.razorpay.com/tta2024

Post a Comment

0 Comments