पहा श्रीरामपूरचे नवनिर्वाचित आमदार हेमंत ओगले यांनी मुंबईत कोणाची घेतली भेट
श्रीरामपूर ( टीम - सतर्क खबरबात )
श्रीरामपूर मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार हेमंत ओगले यांनी मुंबईत काँग्रेस नेत्यांची भेट घेतली . त्यांच्या निवडीचे सर्व नेतेमंडळींनी स्वागत केले .
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीसाठी टिळक भवन, मुंबई येथे नवनिर्वाचित आमदार हेमंत ओगले उपस्थित राहिले .
यावेळी आमदार हेमंत ओगले महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालासंदर्भात काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात, माजी विरोधी पक्षनेते श्री. विजय वडेट्टीवार, आ. नितीन राऊत, आ.अमित देशमुख आदी मान्यवरांसह पत्रकार परिषदेला उपस्थित होते .
आमदार हेमंत ओगले यांनी सांगितले की , काँग्रेस पक्षातर्फे 'भारत जोडो' यात्रेच्या धर्तीवर 'स्वाक्षरी मोहीम' राबवून देशाचे महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि निवडणूक आयोग प्रमुखांना बॅलेट पेपरने निवडणूक घेऊन जनतेचा कौल घेण्यासाठी निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले .




Post a Comment
0 Comments