हु ड हु डी ..S..s जोरात..S..s...
11 अंशाच्या खाली तापमान
सतर्क टीम - विशेष वृत्त
नोव्हेंबर महिन्यात सध्या निसर्गाचे निवडणुकी सारखे विचित्र वातावरण पाहायला मिळत आहे .
गेल्या आठ दिवसात दिवसाच्या तापमानात अडीच अंशाने तर रात्रीच्या तापमानात पावणेचार अंशांनी घट झाल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणात गारठा जाणवत असल्याचे चित्र आहे .
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला साधारणपणे कमाल तापमान 32 अंशापर्यंत तर किमान तापमान 20° पर्यंत होते . मात्र पश्चिमेकडील हिमालयीन भागामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने , परिणामी दक्षिणेकडे जोरदार थंडीचे वारे सुरू झाल्याने या तापमानामध्ये घट होत राहिली.
त्यामुळे दिवसाचे तापमान अर्ध्या अंशाने तर रात्रीचे तापमान पाच ते सहा अंशांनी घसरले होते . पुन्हा विचित्र तापमानाचा अनुभव सर्वांनी घेतला .
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अग्रोनोमी विभागाकडे नोंद झालेल्या माहितीप्रमाणे सोमवार 25 नोव्हेंबर रोजी कमाल तापमान 28.6 अंश सेल्सिअस तर किमान तापमान यंदाच्या नीचांकी 10.9 अंशावर नोंदले गेले .
यंदाच्या मोसमातील हे निचांकी तापमान मानले जात आहे . याच महिन्यात सर्वांनी उष्ण तापमान , गुलाबी थंडी , बोचरी थंडी तर आता कडाक्याच्या थंडीचा अनुभव नागरिक विशेषता ग्रामीण भागातून घेतला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे .





Post a Comment
0 Comments