खुनाचे प्रयत्नातील आरोपीना 12 तासामध्ये अटक राहुरी पोलिसांची कारवाई
राहुरी ( प्रतिनिधी )
दिनांक 25/11/2024 रोजी मोमीन आखाडा तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथे आरोपी नारायण बाजीराव चव्हाण रा. मोमीन आखाडा तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर याने चारित्र्याच्या संशयावरून पीडिता हिला लाथाबुक्यांनी व चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
तसेच आरोपी क्र. 1 याची आई व भाऊ हरिभाऊ बाजीराव चव्हाण यांनी आरोपी पीडितेच्या जीविताला धोका उत्पन्न करू शकतो हे माहीत असतांना ही पीडितेला माहेरून धमकावून बोलावून घेतले. अश्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन राहुरी येथे दि. 26/11/2024 रोजी गु.र.न. 1220/2024 भा. न्या. स. कलम 109(1), 118(2), 115(2), 351(2)(3) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
गुन्ह्यातील आरोपी नामे नारायण बाजीराव चव्हाण व आरोपीची आई यांना दि. 26/11/2024 रोजी गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. यातील तिसरा आरोपी हरिभाऊ बाजीराव चव्हाण यास पुणे येथून ताब्यात घेण्यासाठी पथक रावांना केलेले आहे.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब , पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक श्री कलुबरमे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पोउपनी लक्ष्मण औटी, पोहवा गायकवाड, पोहवा राहुल यादव, पोना गणेश सानप, लेखणीक पोशी रवींद्र कांबळे,पोशी अजिनाथ पाखरे,पोशी प्रमोद ढाकणे, पोशी भगवान थोरात, पोशी ठोंबरे, पोशी अंकुश भोसले, पोशी सचिन ताजने, पोशी सतीश कुऱ्हाडे यांच्या पथकाने केली आहे


Post a Comment
0 Comments