Type Here to Get Search Results !

पेट्रोलमध्ये आता आणखी 5 % इथेनॉल ; वाहनांची सुरक्षा धोक्यात येणार का ?

 पेट्रोलमध्ये आता आणखी 5 % इथेनॉल ; वाहनांची सुरक्षा धोक्यात येणार का ?



सतर्क खबरबात - विशेष वृत्त

आपण आपली गाडी बंद पडल्यावर पाहतो व लक्षात येते की पेट्रोल टाकीत नक्कीच पाणी गेले असेल .



बऱ्याच वेळा पाण्याचा थेंब जरी गेला तरी टाकीतील पेट्रोल जलयुक्त होत गाडी बंद पडून इंजिन खराब होण्याचा धोका संभवतो , मग आपल्या तक्रारी वाढत पेट्रोल भेसळ तर नाही ना ? अशी शंका येते . मात्र प्रत्यक्षात काही गोष्टी समोर आल्या आहेत .

 प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध वृत्तामध्ये राज्यातील सर्व पेट्रोल पंपांवर इथेनॉल मिश्रित पेट्रोलमध्ये आणखी पाच टक्के वाढ होत 20 टक्के करण्यात आली आहे .

पूर्वी हेच प्रमाण 15% पर्यंत होते . पेट्रोलमध्ये इथेनॉलचे वाढलेल्या प्रमाणामुळे वाहनधारकांसह पंपचालकही हैरान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे .

भारत पेट्रोलियम , हिंदुस्तान पेट्रोलियम आदी तेल कंपन्यांचे राज्यात हजारो पेट्रोल पंप असून या पंपांवर यापूर्वी इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण 15% पर्यंत असायचे ते आता 20 टक्क्यांपर्यंत करण्यात आल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे . 

बहुतांश पेट्रोल पंपावरील साठवणूक टाक्या जुन्या झालेल्या असल्याने त्या ठिकाणी पाणी गेल्यास इथेनॉल पेट्रोल पासून वेगळे होत रंग बदलल्याने त्याचा दोष वाहनावर होतो , असा अनेकांचा अनुभव आहे . आता इथेनॉल मिश्रित पेट्रोल मुळे वाहन चालक आणि पेट्रोल पंप वाल्यांच्या डोकेदुखीत वाढ होणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

( माहिती स्त्रोत - मुद्रित प्रसार माध्यम )

Post a Comment

0 Comments