आमदार हेमंत ओगले यांना स्वस्त धान्य दुकानदार कल्याणकारी संघाने दिले विविध मागण्यांचे निवेदन
श्रीरामपूर ( विशेष प्रतिनिधी )
अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार कल्याणकारी संघाने आमदार हेमंत ओगले यांची आज भेट घेऊन त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले . तसेच श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्याबद्दल सन्मान केला .
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या अडचणी व समस्या नमूद करून त्यावर मार्ग काढण्याची मागणी त्यांनी केली. येत्या अधिवेशनात त्यांच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असल्याची भूमिका त्यांच्यासमोर मांडली.
यावेळी श्रीरामपूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्री. करणदादा ससाणे, शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त श्री. सचिन गुजर, अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार कल्याणकारी संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. देविदास देसाई, जिल्हा सचिव श्री. रज्जाक पठाण, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब दिघे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री. चंद्रकांत झुरंगे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते .


Post a Comment
0 Comments