गृहरक्षक दलाचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी होमगार्ड पथकाचे वतीने आज दि.१२/१२/२०२४ रोजी सकाळी गृहरक्षक दलाचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र होमगार्ड ध्वजाचे ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली.
याप्रसंगी होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त मा. महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह, होमगार्ड महानिदेशक श्री. विवेक श्रीवास्तव, गृहसचिव श्री. गोविंद मोहन, महासमादेशक महाराष्ट्र होमगार्ड श्री. रितेश कुमार, जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे यांचे शुभेच्छा संदेशांचे वाचन करण्यात आले.
वर्धापन दिनानिमित्त होमगार्ड पथकातील पुरुष व महिला सदस्यांनी श्रमदान केले व पोलीस स्टेशन जवळ श्रीदत्त मंदिर व परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संजय ठेंगे तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी होमगार्ड सदस्यांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी राहुरी पथकाचे समादेशक अधिकारी आरिफ इनामदार, होमगार्ड सदस्य संजय औटी, सावित्रा तमनर, सतिष कुलथे, अशोक वाकचौरे, आदिनाथ ढोकणे, महेश म्हस्के, विजय जाधव, अजय प्रधान, अक्षय तनपुरे, शहाराम वराळे, पोपट मगर, चंद्रभान तमनर, यशवंत बाचकर, भरत नजन, गौतम खळेकर, भाऊसाहेब धनेधर, गणेश दांगट, महिला सदस्य अनिता लोखंडे, अरुणा सत्रे, शहाबाई पवार, लंका गायकवाड व इतर होमगार्ड सदस्य उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments