Type Here to Get Search Results !

अवैध व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, सामाजिक कार्यकर्ते डाॅ. मकासरेंची एसपींकडे अजब मागणी.

 अवैध व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, सामाजिक कार्यकर्ते डाॅ. मकासरेंची एसपींकडे अजब मागणी.


राहुरी ( प्रतिनिधी )

अहिल्यानगर जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होण्यासाठी अवैध धंदे/ व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्याबाबत भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलनाचे अध्यक्ष व तालुक्यातील वळण येथील रहिवासी डाॅ. विजय मकासरे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.







     निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की, आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या आशिर्वादाने जे अवैध व्यवसाय सुरू आहेत त्याबाबतचे व्हिडिओ व ओडियो रेकाॅर्डींग आमच्याकडे पुराव्याकामी उपलब्ध आहे. यावरून असे दिसून येते की, आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय/धंदे सुरू आहेत. अशा प्रकारचे अवैध धंदे नि व्यवसाय आणि त्यातून निर्माण होणारा रोजगार पाहता आपण जर आम्हाला अवैध व्यवसाय करण्यासाठी परवानगी दिली तर दैनंदिन वाढत असलेल्या बेरोजगारीला लगाम बसेल, व अहिल्यानगर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना गुटखा विक्री, दारू विक्री, मटका, जुगार, वाळू चोरी, गौण खनिज चोरी इत्यादी व्यवसाय सुरू करून आपला उदरनिर्वाह करता येईल. 


  त्यामुळे अशा धंदे/व्यवसायांना आपण परवानगी द्यावी यासाठी संबंधित पोलिस ठाणे, बीट हवालदार यांची काही रास्त मागणी असल्यास ती आपण आपल्या स्तरावरून आम्हास लेखी पत्राद्वारे कळवावी. शक्य झाल्यास ती पुर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही निवेदनात डाॅ. विजय मकासरे यांनी म्हटले आहे. 

Post a Comment

0 Comments