Type Here to Get Search Results !

या आमदारांची गोपाल कृष्ण गोशाळेला भेट

राहुरी फॅक्टरीच्या गोपाल कृष्ण गोशाळेला आमदार हेमंत ओगले यांची भेट



देवळाली प्रवरा ( प्रतिनिधी )

 श्रीरामपूर राहुरी विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत ओगले यांनी देवळाली प्रवरा  चिंचविहिरेे  येथील गोपाल कृष्ण गोशाळेला नुकतीच सदिच्छा भेट दिली .

त्यांच्यासोबत उद्योगपती श्री राकेशजी न्याती , वैभव गिरमे , वीर पिता राजेंद्र सोळंकी , चॉईस बाजारचे छाजेड , शरद वाळके , माऊली वाणी , आदी गोप्रेमी उपस्थित होते. 



आमदार ओगले यांच्या हस्ते यावेळी गोमातेची पूजा करण्यात आली.  गोशाळेसाठी निधी डबल करावा , अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली . त्यांचे आभार मानून त्यांचा छोटासा सत्कार डॉक्टर हर्षद चोरडिया यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचे ललित चोरडिया यांनी आभार मानले .

Post a Comment

0 Comments