नगर जिल्ह्यातील या आमदारांची विधिमंडळात दमदार एन्ट्री : बहादुरगडाच्या संवर्धनासाठी केली मागणी
सतर्क खबरबात टीम - विशेष वृत्त
श्रीरामपूर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार हेमंत ओगले यांनी महाराष्ट्र राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशन नागपूर येथे काल विधीमंडळात राज्याचे मंत्री मा. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह प्रवेश केला .
यावेळी मतदारसंघातील विविध विकासकामांसंदर्भात मंत्री महोदयांशी सकारात्मक चर्चा केली. तसेच श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आगामी काळात भरीव निधी देण्यात यावा , अशी मागणी त्यांच्याकडे व्यक्त केली.
नागपूर येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण बाबींवर चर्चा केली.
श्रीगोंदा तालुक्यातील बहादूर गड या छत्रपती संभाजी महाराजांचे वास्तव्य असलेल्या किल्ल्या बाबत संवर्धन करण्यासाठी निर्णय घ्यावा , अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी केले . यावेळी मराठी शाळांचे थांबवलेले अनुदान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला नवोदय योजनेसंदर्भात सरकारचे लक्ष वेधले. श्रीरामपूरचे नवनिर्वाचित आमदार हेमंत ओगले यांच्या एन्ट्री ची व मांडलेल्या प्रश्नांबाबत श्रीरामपूर राहुरी तालुक्यात चर्चा होत आहे .


Post a Comment
0 Comments