Type Here to Get Search Results !

राहुरी तालुक्यातील या एकमेव साखर कारखान्याचे उसाचे

राहुरी तालुक्यातील या एकमेव  साखर कारखान्याचे उसाचे

                                        (संग्रहित फोटो)

राहुरी ( प्रतिनिधी )

राहुरी तालुक्यातील एकमेव खाजगी प्रसाद शुगर्स या  साखर कारखाने आज अखेर एक लाख पंधरा हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून एक लाख दहा हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे .


    योग्य किमतीत लोखंडी                काऊंटर  विकणे  आहे 

       संपर्क - 9225260710

                                  ( Advt )

 कारखान्याचा 9.53 इतका साखर उतारा असून यावर्षी पाच लाख टन अधिक ऊस गाळपाचे कारखान्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले जाते . दरम्यान नगर जिल्ह्यातील 18 साखर कारखान्यांनी 26 लाख मेट्रिक टन ऊस गाळप केला असून त्या पोटी 29 लाख 85 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे . 


कानिफनाथ वॉशिंग सेंटर , वाणी ओढा , राहुरी फॅक्टरी .

  ( Advt )



दत्तगुरु टायर वर्क्स , वाणी ओढा , राहुरी फॅक्टरी .

 ( Advt )

यात 11 सहकारी कारखाने तर सात खाजगी साखर कारखान्यांचा समावेश आहे . गेल्या दोन-तीन वर्षांपासून राहुरी येथील डॉक्टर तनपुरे साखर कारखाना बंद अवस्थेत आहे . राहुरी तालुका उसाचे आगार मानले जाते . तालुक्यातील ऊसावर नगर जिल्ह्यातील प्रवरा , संगमनेर , कोळपेवाडी , संजीवनी , अशोक , मुळा , आदी साखर कारखान्यात मध्ये ऊस तोडून त्याचे गाळप केले जाते . 

यंदा राहुरी तालुक्यात आठ ते नऊ लाख मेट्रिक ऊस गाळपासाठी उपलब्ध असल्याची माहिती सांगितली गेली आहे . यंदाच्या वर्षी ऊस उत्पादक शेतकरी कांदा पिकाकडे वळल्याचे देखील चित्र दिसून येत आहे . तरीही मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन झालेले असल्याने राहुरी तालुक्यात बाहेरील सात ते आठ साखर कारखान्याच्या ऊस तोडणी सध्या सुरू असल्याचे चित्र आहे . तालुक्यातील वांबोरी येथील प्रसाद शुगर्स या साखर कारखान्यांचे आत्तापर्यंत एक लाख 15 हजार मेट्रिक टन ऊस गाळप झाले असून सध्या ऊस तोडणी सुरळीत सुरू आहे . कारखान्याचे व्यवस्थापनाकडून वेळोवेळी ऊस तोडणी , ऊस वाहतूक , आदीचे चोख नियोजन करण्यात येत आहे .

Post a Comment

0 Comments