दोन वेळा आमदार झालेल्यांना न्याय मिळत नसेल तर...?
नागपूर - सतर्क खबरबात टीम
नागपूर हिवाळी अधिवेशनात राहुरी श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनी आज माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या वरील झालेल्या गोळीबाराबाबत औचित्याचा मुद्दा आज उपस्थित केला .
दोन वेळा आमदार झालेल्यांना जर न्याय मिळत नसेल तर
सामान्यांचे काय ? असा सवाल आमदार हेमंत ओगले यांनी विधिमंडळात उपस्थित केला .
नागपूर येथे सध्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे . श्रीरामपूरचे नवनिर्वाचित आमदार हेमंत ओगले यांनी आज औचित्याचा मुद्दा उपस्थित करत म्हटले की , श्रीरामपूर मतदार संघातील माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर 20 नोव्हेंबर 2024 रोजी मध्यरात्री वाहनावर गोळीबार झाला होता . त्यावर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादही दाखल झाली आहे . मात्र अद्याप एकही आरोपी अटक नाही .अद्याप कार्यवाही का नाही ? असा सवाल करत आमदार हेमंत ओगले म्हणाले की , जर दोन वेळा आमदार झालेल्यांना न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्यांचे काय ? यावर त्वरित कार्यवाही करण्याचे ओगले यांनी सभागृहात सूचित केले.



Post a Comment
0 Comments