राहुरीत जगतगुरु स्वामी नरेंद्राचार्य यांच्या पादुका दर्शन सोहळ्यास भाविकांची मांदियाळी
राहुरी ( प्रतिनिधी )
दक्षिण पीठ नाणीजधामचे मठाधिपती जगतगुरु स्वामी नरेंद्राचार्य यांचे पादुका दर्शन व प्रवचन सोहळा गुरुवारी राहुरी शहरात मोठया उत्साहात संपन्न झाला. जिल्ह्यातील हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवुन सोहळ्याचा आनंद लुटला.
प्रारंभी राहुरी शहरातील शनी मंदिर येथून जगतगुरु स्वामी नरेंद्राचार्य यांच्या सिद्ध पादुकांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. माता भगिनी, अबालवृद्ध या मिरवणुकीत सहभागी झाले होते. नगर-मनमाड रोडलगत भव्य पटांगणात मिरवणूक पोहचल्यानंतर आरती, पादुका पूजन, प्रवचन, उपासक आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
यावेळी सामाजिक जाणिवेच्या भूमिकेतून अहिल्यानगर जिल्ह्यातील स्व स्वरूप संप्रदायाच्यावतीने उत्तर महाराष्ट्र पीठ नाशिक ते श्री क्षेत्र नाणीज पायी दिंडी सोहळ्यासाठी टॉयलेट वाहनाचे वितरण करण्यात आले.यावेळी स्व स्वरूप संप्रदायाचेचे उत्तर महाराष्ट्र, अहिल्यानगर दक्षिण व उत्तर जिल्ह्याचे पदाधिकारी व हजारो भाविक उपस्थित होते. यावेळी पादुका दर्शन सोहळ्यासाठी भाविकांची रांग लागली होती.हजारो भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्व स्वरूप संप्रदायाचे उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकारी व भाविकांनी अथक परिश्रम घेतले



Post a Comment
0 Comments