संस्कृती फाउंडेशन स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
राहुरी ( प्रतिनिधी )
मदर्स एज्युकेशन सोसायटीचे, संस्कृती फाउंडेशन स्कूल आणि संस्कृती किड्स या शाळेमध्ये मंगळवार दिनांक 27 डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका न्यायाधीश श्रीमती अनुपमा परशेट्टी मॅडम, श्री युवराज पाचरणे साहेब वनाधिकारी, श्री गजेंद्र इंगळे साहेब पी.एस.आय. एस पी ऑफिस अहिल्यानगर, ऍडव्होकेट संग्राम संभाळे साहेब हे उपस्थित होते. तसेच संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री सुरेश तनपुरे सर, संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती संजीवनी तनपुरे मॅडम संस्थेचे सेक्रेटरी, प्राचार्य श्री अभिजीत सर, संस्थेच्या लीगल अडवायझर ऍडव्होकेट सौ.वृषाली तनपुरे मॅडम, सौ ऋचा वाडकर मॅडम हे ही उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी पाच वाजता दिपप्रज्वलन करून व सरस्वती पूजन करून करण्यात आली.त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले.
सध्याच्या काळात मुलांकडून मोबाईलचा अतिवापर होत आहे व त्याचे दुष्परिणाम मुलांच्या मनावर व शरीरावर होत आहे त्याबद्दल पालकांनी जागरूक राहायला हवे आणि आपल्या मुलांमधील कलागुणांचा विकास करायला हवा,असे संबोधन याप्रसंगी बोलताना श्रीमती अनुपमा परशेट्टी मॅडम यांनी पालकांना केले. श्री गजेंद्र इंगळे साहेब यांनीही विद्यार्थ्यांना गुन्हा होण्यापासून स्वतःला कसं वाचवता येईल, सुरक्षितता व सतर्कता कशी ठेवावी याविषयी मार्गदर्शन केले.ऍडवोकेट वृषाली मॅडम यांनीही आपल्या शैलीत विद्यार्थ्यांना आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करावे व फक्त त्याच दिशेने जावे अशा सुंदर शब्दात सांगितले .
यावेळी प्रथम वार्षिक क्रीडा बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.' स्टुडन्ट ऑफ द इयर' ची ट्रॉफी तन्वी गाडे या मुलीला तर प्रथमेश शिर्के या मुलाला मिळाली. शैक्षणिक वर्ष 2024- 25 चा कॉक हाऊस कप' नेहरू हाऊस' या संघाला मिळाला. त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले शिवराज्याभिषेक सोहळा. पालकांकडून या कार्यक्रमाचे खूप कौतुक केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका श्रीमती कविता जपे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे संस्थापक आदरणीय श्री तनपुरे सर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता 'वंदे मातरम' ने करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.


Post a Comment
0 Comments